अकोट (प्रतिनिधी)- तळेगाव खुर्द येथील १९ वर्षीय तरुणीचे आत्महत्या प्रकरणी हिवरखेड पोलिस स्टेशन ठाणेदार आशिष लवंगडे व इतर पोलिसांना सह आरोपी करून अटक करा अन्यथा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा वंचितचे राज्य प्रवक्ते व युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी आज मुलीच्या पालकासह अकोट उपविभागीय अधिकारी ह्यांना दिला.
२२ तारखेला विनयभंग आणि एट्रोसिटी गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक मुलीचे काका व चुलतभाऊ व इतर दोघांवर काउंटर केस केल्या.त्यामुळे मुलीच्या मनात भिती निर्माण झाली होती.पिडितेच्या कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण न दिल्याने विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या शिवाजी शिंगोकार ह्याचा भाऊ दिगंबर आणि इतरांनी पीडीत तरुणी व तिच्या कुटुंबातील सदस्यांना घरी जाऊन सातत्याने धमक्या दिल्या.त्यामुळे २५ तारखेला पीडित तरुणीने आत्महत्या केली.ह्या प्रकरणात ठाणेदार लवंगडे ह्यांच्या सोबत पोलिसांनी सातत्याने आरोपींना मदत केली.सर्व आरोपी अटक असताना पोलिसांनी ठाणेदाराच्या आदेशानुसार काल आरोपीच्या घरात असलेला कापूस विकुन आरोपींना आर्थिक मदत उभी केली.कापूस विक्री करीता तंटा मुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील ह्यांना पोलिसांनी मदतीला घेतले।
त्यामुळे ठाणेदार व पोलीस कर्मचारी ह्यांचे विरुद्ध कर्तव्यात कसूर आणि आरोपींना सहकार्य करण्या बद्दल अट्रोसिटी चे कलम ४ व ३(२)(६) नुसार सहाआरोपी करून अटक करावी अशी तक्रार मुलीचे वडीलांनी उपविभागीय अधिकारी सोनोवणे ह्यांना दिली.मुलीचे वडीलांनी दिलेल्या तक्रारी नुसार ठाणेदार लवंगडे, पोलीस कर्मचारी महल्ले, बुरकुटे ह्यांना तीन दिवसात अटक न झाल्यास वंचित बहूजन आघाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेल असा इशारा देण्यात आला.
वंचित प्रदेश प्रवक्ते तथा वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी पत्रकारपरिषदेला देखील संबोधित केले.पत्रकार परिषद मध्ये वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,काशिराम साबळे, अशोक दारोकार,शैलेश धांडे,गोपाल कोल्हे, विकास पवार,सुरेश हिवराळे,दयाराम हीवराळे,साहेबराव हिवराळे,सचिन शिराळे,विकास सदांशिव सुदर्शन बोदडे,पं समिती सदस्य महोम्मद इद्रिस,सुभाष तेलगोटे, विलास हिवराळे,इश्वर झास्कर, रोशन दारोकार, मो. राजीक,भाउराव थोरात, सुगत वानखडे, आशिष रायबोले, मयुर सपकाळ, शत्रुघ्न नितोने, सदानंद तेलगोटे, सागर छप्परवार, नितीन वानखडे,अमन गवई आदींची उपस्थिती होती.