नवी दिल्ली :
कोरोना संकटकाळात सहा महिन्यांसाठी लोन मोरॅटोरियमची सवलत कर्जदारांना देण्यात आली होती. या सवलतीचा फायदा घेतलेल्या ज्या कर्जदारांकडून बँकांनी व्याजावर व्याज वसूल केले आहे, त्यांना ती रक्कम कॅशबॅकच्या रुपाने परत दिली जाणार आहे. मात्र पीककर्ज तसेच ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेल्यांना ही सूट दिली जाणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
५ नोव्हेंबरपूर्वी वसूल करण्यात आलेले व्याजावरील व्याज परत केले जाणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. कृषी तसेच त्याच्याशी संबंधित कामांसाठी ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे, त्यांना व्याजावरील व्याज परत केले जाणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितल्यामुळे या श्रेणीत कर्ज घेतलेल्यांना व्याजावर व्याज भरावेच लागणार आहे.
लॉकडाऊन काळात कर्जदारांना EMI भरण्यास सवलत दिली होती. तथापि, ज्या कर्जदारांनी ही सवलत न घेता बँकांना EMI नियमित भरला होता त्यांना आता बँकेकडून कॅशबॅक मिळणार आहे.