पातुर(सुनिल गाडगे)-
दि.०४ ऑक्टोंबर २०२० ला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरंग गावात तेथील शेतकरी भूमिपुत्रानी पिक कर्ज आणी पावसाने खराब झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात विचारणा केली म्हणून एक जवाबदार लोकप्रतिनीधी व मंत्र्यांनी त्या मराठा कुटूंबातील शेतकरी मुलाला अर्वाच्य भाषेत अतिशय खालच्या स्तरातील शिविगाळ केली आणी घरात घुसून जीवे मारण्याची सार्वजनिक ठिकाणी धमकी दिली.याचा राग व रोष नागरीकांमध्ये आहे.
सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी आज पातुर शहरात धिक्कार मोर्चाचे आयोजन होते परंतु तालुक्यावर माजी आमदार कै.जगन्नाथ ढोणे साहेब यांच्या अचानक निधनाने दु:खाचे सावट पसरले आहे या कारणाने काढण्यात येणारा धिक्कार मोर्चा सर्वानुमते निर्णय घेऊन रद्द करण्यात आला.म्हणून काही ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पातुर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
याप्रसंगी निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडगे , डिगांबर डहाळे , सैय्यद खालेद , बंडू परमाळे , अण्णासाहेब पाटील , महेंद्र ढोणे , स्वप्निल इंगळे , नितिन खंडारे , अतुल बायस , विनोद तेजवाल यांची उपस्थिती होती.