अकोला(प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे द्वारा संचालित समतादूत प्रकल्पामार्फत यावर्षी कोरोना संक्रमण असल्याने अकोला जिल्हात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य दिनांक १४/ऑक्टोबर/२०२० ते २६/ऑक्टोबर/२०२० या काळात ऑनलाइन प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रसिद्ध नामवंत प्रबोधनकार,वक्ते,कवी,साहित्यिक,विधिज्ञ यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावत जनजागृतीपर मार्गदर्शन केले.अकोला जिल्हात जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्या मार्गदर्शनात एकूण ६ ऑनलाइन कार्यक्रम संपन्न झाले.हे कार्यक्रम बाळापूर समतादूत प्रज्ञा खंडारे,पातूर समतादूत समता तायडे यांच्या मुख्य संयोजनात पार पडले.जिल्हातील विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते,सरपंच तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हातील समतादूत ऍड.वैशाली गवई,रविना सोनकुसरे,स्मिता राऊत,शुभांगी लव्हाळे,मनेश चोटमल,उपेंद्र गावंडे,विनोद सिरसाट यांनी सहकार्य केले.