अकोट( शिवा मगर )-दि.24/10/2020 रोजी मौजा अडगाव शिवारात वन्यप्राणी रानटी डुक्कर च्या शिकारी च्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्ब सह आरोपी पकडण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक वन्यजीव विभाग अकोट यांना गस्ती दरम्यान ठाणेदार हिवरखेड माहितीवरून मौजा आडगाव शिवारात वन्यप्राणी रानटी डुक्कर च्या शिकारी च्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्ब सह आरोपी नामे 1) तेजपालसिंग करतारसिंग जुनी रा. निमखेडी ता संग्रामपूर जी बुलढाणा 2) किरपालशिग तुतूसिंग बाबर रा निमखेडी ता संग्रामपूर जी बुलढाणा दोन्ही आरोपीना पकडल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक अकोला वनविभाग अकोलाच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर वनविभागान अकोला यांनी
वनगुन्हा क्र. 21/2018 दि. 24/10/2020 नूसार भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 कलाम 9,27,29,31,32,39,48,51नुसारदि 25/10/2020 ला न्यायालयीन कोठडीत चौकशी मध्ये आरोपी एकूण 24 गावठी जिवंत बॉम्ब हस्तगत केले आणि एक रानटी डुक्कर बॉम्ब खाल्ल्याने मृत झाल्या मुळे पशुधन विकास अधिकारी आडगाव याचे मार्फत शवविच्छेदन करून नियमानुसार कारवाही केले आरोपींना न्यालायात दाखल केले वरील सर्व कार्यवाही मा, k. R. अर्जुन उपवनसंरक्षक अकोला वनविभागा अकोला मा. श्री सुरेश वलोदे सहाय्याक वनरक्षक अकोला (वने) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री S. S. सिरसाट वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक अकोला श्री अजय बावणे वनपरिमंडळअधिकारी अकोट वर्तुळ व अधिनस्त वन कणकर्मचारी S.G. जोंधळे वनरक्षक शहानुर बिट, D.A सुरजूसे वनरक्षक बोर्डी बिट श्री g.p घुळे वनरक्षक वि.से. अकोट वर्तुळ यांनी पार पाडली