अकोला,दि.23 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 143 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 125 अहवाल निगेटीव्ह तर 18 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर तीघांचा मृत्यू झाला आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८२०३ (६६२३+१४०३+१७७) झाली आहे. आज दिवसभरात 27 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42257 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 41167 फेरतपासणीचे 214 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 876 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42006अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35383 तर पॉझिटीव्ह अहवाल ८२०३ (६६२३+१४०३+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 18पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 18जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जिएमसी व अकोट येथील प्रत्येकी तीन जण, मूर्तिजापूर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत बार्शीटाकळी, सागळुद खावाद, रतनलाल प्लॉट, मराठा नगर, तोरोकर हॉस्पिटल, बाळापूर, खवासा बु. ता. अकोट व ज्ञानेश्वर नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
तीन मयत
दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाला. त्यात अनोळखी ६० वर्षीय पुरुष असून तो दि. २१ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच राजंदा ता.बार्शीटाकळी येथील ८५ वर्षीय पुरुष असून तो दि. १९ ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मलकापूर येथील ६८ वर्षीय महिला असून ती २२ ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
27 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५ जणांना, सुर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जण व हॉटेल रिजेंसी येथून एक जणांना’ अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
474 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ८२०३ (६६२३+१४०३+१७७)आहे. त्यातील 270जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7459 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 474 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.