अकोट(देवानंद खिरकर)-नांदखेड ते चोहट्टा बाजार रोडवर बंगाली काट्या खुप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.या बंगाली काट्यामुळे समोरुन येणार्या,जाणार्या टू व्हीलर गाड्या,फोरव्हीलर गाड्यांना समोरुन रस्ता सुध्दा दीसत नाही.अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे या रोडवर यक्सिडेन्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या बाबत शिवसेना अकोट उपतालुका प्रमुख गोपाल म्हैसणे यांनी सबंधीत सा.बा.विभाग यांना कित्येकवेळा तक्रारी सुध्दा दिल्या आहेत.फ़ोन द्वारे माहिती दिली आहे.परंतू सा.बा.विभागाचे अधिकारी हे याकडे मात्र साफ दुर्लक्ष करित असल्याचा आरोप देखील केला आहे.याबाबत सबंधीत विभाग यांनी 8 दिवसात सदर रोड असलेल्या बंगाली काट्याची दखल घेवुन त्वरित रोड सफा करावा.अन्यथा कारवाई न केल्यास शिवसेने तर्फे अंदोलन करण्यात येईल असा ईशारा गोपाल म्हैसणे यांनी दिला आहे.