अकोला(प्रतिनिधी)– पक्षाच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे आता युवकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संग्रामभैय्या गावंडे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये केले. अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा सभा जिल्हाध्यक्ष मा. श्री. शिवाभाऊ मोहोड यांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित या सभेमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या सुद्धा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संग्रामभैया गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा सभेला ज्येष्ठ नेते माजी आमदार मा. श्री. हरिदासजी भदे साहेब, माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. श्रीकांतदादा पिसे पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या मा. डॉ. आशाताई मिरगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. शिवाभाऊ मोहोड, अकोल्याचे रायुकाॅ निरीक्षक मा. अनंतराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. परिमल लहाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्री. करण दोड, तालुकाध्यक्ष श्री गावंडे, मुर्तीजापुर विधानसभा अध्यक्ष श्री सचिन बोनगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. श्री. शिवाभाऊ मोहोड यांनी आतापर्यंत झालेल्या व पुढे करावयाच्या विविध कार्य व उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष विस्तारासाठी जोमाने व जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या, त्यामध्ये मुर्तीजापुर शहर अध्यक्षपदी श्री. शुभम मोहोड, तेल्हारा निरीक्षकपदी श्री. हर्षल ठाकरे, जिल्हा महासचिव पदी श्री. तुषार शिरसाट, बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी सरपंच श्री. किरण ठाकरे, बाळापुर तालुकाध्यक्षपदी श्री. विक्की दांदळे, अकोला तालुका पश्चिम कार्याध्यक्षपदी श्री. गौरव गावंडे, अकोला तालुका पूर्व अध्यक्षपदी श्री. विक्की लाखे, अकोट तालुका महासचिवपदी उमेश बोरचाटे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला श्रीराम ताले, ज्ञानेश्वर ताले, बाळासाहेब तायडे, अमोल लोकरे, राम म्हैसणे, राहुल टाले शिवाजी पटोकार, पंकज काळे, वैभव मानकर, रिजवान खान, आफिक कुरेशी, आशिष सरपाते, अनंत पाचबोले यांच्यासह अकोला महानगर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री. मोहन शेळके यांनी तर आभार प्रदर्शन महानगराध्यक्ष श्री. करण दोड यांनी केले.