• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड पक्षांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांची टोळी अटकेत,9 मृतपक्षी, टाटा विंजर गाडीसह 3 आरोपी जेरबंद

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 22, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
शिकार
13
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज) –
हिवरखेड येथे सतर्क आणि जागरुक नागरिकांनी काही अनोळखी व्यक्तींना संशयास्पदरित्या बंदुकीने पक्ष्यांची शिकार करताना प्रत्यक्षरीत्या पाहिल्याने त्यांनी ही गुप्त माहिती तत्काळ एका कर्तव्यदक्ष वनरक्षकाला दिली. सोबतच काही ईसम पक्ष्यांची शिकार करून गाडीमध्ये घेऊन जात आहेत अशी गुप्त माहिती
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संरक्षण दल यांना मिळाली. त्यावरून अकोट- तेल्हारा- सोनाळा या टी पॉइंटवर ढाब्या जवळ सापळा रचण्यात आला. तेव्हा सदर ठिकाणी दुपारी टाटा विंजर 14 सीटर वाहन क्रमांक एम एच 12 एम डब्ल्यू 8412 या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये वाहनचालक आणि दोन व्यक्ती आढळून आले. त्यांना विचारणा केली असता त्या व्यक्तींनी नावे मोहम्मद फैजल मोहम्मद इस्माईल, इम्तियाज अहमद नजीमोद्दिन अहमद, मोहम्मद इमरान मोहम्मद उस्मान, सर्व राहणार मालेगाव जिल्हा नाशिक असे सांगितले. सदर शिकाऱ्याकडे 6 रातवा पक्षी (नाईट जार), 2 पारवा पक्षी (ब्लू रॉक पीजन), 1 जंगली कबूतर (कोलार्ड डोव्ह) असे एकूण 9 पक्षी शिकार केलेल्या मृत अवस्थेमध्ये आढळून आले.

सदर टाटा विंजर गाडीची तपासणी केली असता आरोपीकडून एक एअरगन, 25 छर्रे बुलेट, एक चाकू, एक बॅटरी, घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. सदर आरोपींची अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली असता त्यांनी त्यांचे एकूण नऊ साथीदारांसह दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभाग आकोट अंतर्गत वनपरिक्षेत्र वान मधील परिवर्तुळ पूर्व झरी वन अखंड क्रमांक 1087 मध्ये वनगुन्हा केल्याचे दिसून येते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सदर प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक यांनी भारतीय वन अधिनियम तसेच वन्य जीव संरक्षण अधिनियम चे विविध कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले.
सदर प्रकरणी पुढील तपास विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संरक्षण दल हे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प एस एम रेड्डी, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
उपरोक्त कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, वान रेंज चे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण डी पाटिल, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक विश्वनाथ चव्हाण, वनपाल एम.सी. ठाकूर, वनरक्षक, सरंजू भारती, एम बी अंभोरे, कैलास चौधरी, इत्यादींनी सहभाग घेतला.

Tags: शिकारशिकाऱ्यांची
Previous Post

मूर्तिजापूर ते हिरपूर रोडची त्वरित दुरस्ती करा,संताजी सेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Next Post

घोडेगाव ग्राम पंचायतच नव्हे तर संपूर्ण गावच समस्यांच्या विळख्यात!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ग्राम पंचायत

घोडेगाव ग्राम पंचायतच नव्हे तर संपूर्ण गावच समस्यांच्या विळख्यात!

आंदोलन

वंचित चे चिपको आंदोलन यशस्वी, नविन वृक्ष लागवडीशिवाय वृक्षतोड होणार नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.