अकोट(शिवा मगर)- तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु विद्युत उपकेंद्र शिवारातील सदरपूर येथे कृष्णा मेतकर यांच्या शेतात मुख्य ट्रान्सफर्मापासून ते पूर्ण शेतात वाहती विद्युत तार जमिनीपासून 4 ते 5 फूट अंतरावर लोंबत आहे यातून गुरांसोबतच मानवी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता रब्बी पिकास सुरुवात होणार आहे अश्यामध्ये ह्या तारेमुळे कशी शेती ची मशागत व पेरणी करावी ह्याबाबत प्रश्नचिन्ह शेतकर्यांना पडलेला आहे गावलगतच असल्यामुळे येथे लोकांची खूप भरदळ असते आणि गावाला लागूनच ह्या तारा लोंबत आहे हाताने स्पर्श करता येईल, अशा अवघ्या पाच ते सहा फूट अंतरावर वर वीज वितरण कंपनीचे विद्युत प्रवाह असलेले तार लोंबकळत आहेत. येथून जवळच ट्रान्सफॉर्मर असून, उच्चदाब वीज प्रवाह असलेले हे तार आहेत या तारांखालुन गुरे, शेतमजूर आणि शेतकरी आवक जावक आहे त्यामुळं कोणत्याही वेळी अनुचित प्रकार दुर्घटना घडेल याबाबत दुमत नाही..
महावितरण उपकेंद्र अडगांव बु येथे तक्रार केली असता ह्यावर काहीच सकारात्मकता व कर्तव्याची त्यांना जाणीव नसल्याचं दिसून येत
शेतक:यांची संपत्ती म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे किमान एक मानवी आणि आपले कर्तव्य म्हणून याबाबाबत महावितरण ने आवर्जून लक्ष द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे