• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निकृष्ट कोरोना चाचणी किट्स प्रकरणी दोषी अधिकारी व कंपनीवर गुन्हा दाखल करा

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 18, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
कोरोना
14
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : कोरोनाच्या चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आरटी-पीसीआर च्या किट्स वापरण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणी केल्यानंतर या किटस् निकृष्ट असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. परंतु हे किटस् निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर वैदयकीय शिक्षणा विभागामार्फत ही खरेदी झाल्याचे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर आता जबाबदारी ढकलली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची एस.आय.टीव्दारे चौकशी करुन दोषी अधिकारी व कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

कोरोना चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या किटससंदर्भात गौप्यस्फोट करताना विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, १ ऑक्टोबर पर्यंत भारत सरकारने आरटी-पासीआर कीटस् चा पुरवठा केला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. पण १ ऑक्टोबर पासून राज्य सरकारने खरेदी सुरु करताच अडचणी निर्माण झाल्या. कारण वैदयकीय शिक्षण विभागा अंतर्गत असणा-या डी.एम.ई.आर. ने या निकृष्ट दर्जाच्या किटस् खरेदी केल्या होत्या. या किटस् आरोग्य संचालनालय मार्फत सर्व जिल्हा पातळीवर पोहचविल्या.परंतु कोरोना रुग्णांचा पॉझीटिव्हीटी रेट कमी आल्याने ही बाब लक्षात आली,असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आरटी-पासीआर किटस् यायच्या अगोदर जालना जिल्हयामध्ये २५ टक्क्यांच्या दरम्यान पॉझीटिव्हीटी रेट होता. परंतु या किटस् वापरल्यानंतर हा रेट ०५ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे संशय निर्माण झाल्यामुळे डॉ. हयात नगरकर यांनी याची तक्रार आय.सी.एम.आर., राष्ट्रीय विषाणू संस्था, व सिव्हील सर्जन, जालना यांच्याकडे केल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.जालना जिल्हयामध्ये रेट ऑफ इंन्फेक्शन रेट (पॉझीटिव्हीटी रेट) अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याची बाब डॉ. तात्याराव लहाने यांनी जेव्हा व्हिडोओ कॉन्फरसिंग घेतली तेव्हा डॉ. हयात नगरकर यांनी त्यांच्या समोर मांडली. पण डॉ. लहाने या गंभीर गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुलर्क्ष केले. उलट ही बाब निदर्शनास आणून देणा-या डॉ. नगरकर यांचीच कानउघडणी करण्यात आली. एवढेच नव्हेतर डॉ. नगरकर यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते,असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

दरेकर यांनी पुणे जिल्हयातील असाच प्रसंग सांगताना स्पष्ट केले की, निकृष्ट दर्जाचे किटस वितरित झाल्याचे लक्षात आल्यानंतरही पुण्यामध्ये १० ऑक्टोबर पर्यंत याच किटस् ने रुग्णांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय विषाणू संस्थेने या किटस् निकृष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतरही पुणे जिल्हयात सलग ३ दिवस ह्याच निकृष्ट दर्जाच्या किटसचा वापर करण्यात आला, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.राज्य सरकार कोरोनाबाबत किती गंभीर आहे, हे ह्यावरुन दिसून येते असल्याचे सांगतांना दरेकर म्हणाले की, या सर्व प्रकरणामधून आरोग्य संचालनालयाचा केवळ निष्काळजीपणा दिसून येतो. विशेष म्हणजे किटस् निकृष्ट दर्जाचे आहेत हे लक्षात आल्यानंतरही वैदयकीय शिक्षणामार्फत ही खरेदी झाल्याचे सांगून राजेश टोपे यांनी अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी ढकलली. तर त्याच वेळेस राजेश टोपे यांना हा विषय माहित नसून आरोग्य विभागच याप्रकरणी दोषी असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले गेले, असेही दरेकर यांनी सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीसाठी निकृष्ट दर्जाच्या किट्स पुरवठ्याच्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री गंभीर असतील तर त्यांनी याप्रकरणाची तातडीने एस.आय.टी चौकशी करुन दोषी अधिकारी व कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी यावेळी केली.तसेच या प्रकणात दोषी असणारा वैद्यकीय शिक्षण विभाग असो की आरोग्य विभाग असो त्यांच्याविरुध्द तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचे किटस् पुरविणाऱ्या कंपनीला कायम स्वरुपी काळया यादीत टाकण्यात यावे. तसेच या किटसला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालकांवर तसेच न तपासता हया किटस् स्विकारणाऱ्या आरोग्य संचालकांवरही तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.

Tags: कोरोना
Previous Post

नाराजीचा सूर उमटताच मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणी दौ-यावर

Next Post

मराठा आरक्षणासाठी घटना बदलण्याचा अभ्यास सुरू; संभाजीराजे यांचं मोठं विधान

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मराठा

मराठा आरक्षणासाठी घटना बदलण्याचा अभ्यास सुरू; संभाजीराजे यांचं मोठं विधान

रेल्वे

अकोल्यात शंभर फुट ध्वजस्तंभ व शंकुतला रेल्वे इंजिनचे ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.