अकोट(देवानंद खिरकर)- अकोट नगर परिषदेतील घरकुल प्रकरणी तसेच विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे हे सपत्नीक १० लोकांसह नगरपरिषद कार्यालय अकोट परिसरात आमरण उपोषणाला बसणार आहेत.करीता याबाबत मा.उपविभागीय अधिकारी अकोट यांना आज माहिती सादर केली आहे.
नगर परिषदेमधील घरकुल योजनेचा लाभ गरजु नागरीकापर्यंत अद्यापही पोचलेला नाही.हे सतत निदर्शनास येत असुन शहरातील नागरीकांच्या या विषयावर सततच्या तक्रारी येत आहेत.त्याबाबत नगरपालिका महसूल विभाग तहसील कार्यालय यांना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी स्वतः तसेच पत्नी नगरसेविका सौ.विजया दिलीप बोचे यांच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन दिले.परंतु आज गोरगरीब जनतेविषयी कोणत्याही अधिकाऱ्याची भूमिका ही सकारात्मक दिसली नाही.करीता उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे हे सपत्नीक १० कार्यकर्त्यांसह नगर परिषद अकोट समोर दिनांक १९/१०/२०२० सकाळी ११:०० वाजता पासुन आमरण उपोषणाला बसणार आहेत.अशा आशयाची माहिती आज सादर करण्यात आला आली आहे.त्यामध्ये प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला असून प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.(१) ज्या कुटूंबाकडे स्वताचे मालकीची जागा नसेल व त्यांचेकडे ताबा पावती असेल व ते अनेक वर्षापासुन नगरपरीषद हद्दीत वा नझूलच्या जागेवर राहतात त्यांना शासकीय जागांचा मालकी हक्क (लिज पट्टा) करुन पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल देण्यात यावे.(२) अकोट शहरातील व प्रभाग क्रमांक १० मधील पिढीजात वास्तव्य करीत असलेल्या अतिक्रमन धारकांना राहत्या जागेचा भाडेपट्टा करुण देण्यात यावा.(३) रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थाना त्वरीत घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा (४)एकुण लाभार्थांपैकी शासकीय नियमावलीप्रमाने ५% अपंग लाभार्थांना घरकुल योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा.(५) ज्यांचेकडे स्वताच्या नावाने ७/१२, नमुना ‘ड’, कलेक्टर लेआउट,एस.डी.ओ. लेआऊट,तहसीलदार लेआऊट, गुंठेवारी जागा आहे.अशा अतिक्रमन धारकांचे अतिक्रमन नियमीत करुन त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ देणयात यावा.(६)अतिक्रमण धारकांचा डि.पी.आर. त्वरीत मंजूर करण्यात यावा.(७) अकोट शहरातील जवळपास ४००० अर्ज घरकुल योजनेकरीता प्राप्त झाले असुन पैकी २०३८ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. परंतू त्यातील ४०० नागरीकांनाच अद्यापप्रयंत घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरीत १६३८ प्रकरणांचा त्वरीत निपटारा करावा.(८)शेतकरी,शेतमजूर,अपंग,विधवा, परितक्त्या,निराधार या केशरी (APL) कार्डधारकांना प्राधान्य गटात समावेश करुन BPL दराने धान्यपुरवठा करण्यात यावा.(९) साफसफाई कर्मचारी यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा.कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती पाहता उपोषण स्थळी उपोषणाला बसणारे कार्यकर्ते हे सामाजिक अंतर पाळनार असून याठिकाणी आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे.