अकोट(देवानंद खिरकर )अकोट येथील तहसील कार्यालयावर मानवी हक्क सुरक्षा दल व वहिती जमीन बचाओ आंदोलन कृती समितीचे वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले . सन १९९० पासून अनुसूचित जातीतील लोकांनी गायरान पडिक जमीनी वर आपला उदरनिर्वाह चालविला आहे. तत्कालीन मुख्यमत्री मा.ना. सुशील कुमार शिंदे यांनी सदर जमीनी चा ताबा त्यांना द्यावा असे आदेश अस्तांना सुद्धा आजपर्यंत जमीनी त्यांच्या ताब्यात दिल्याच नाहीत त्यांचे नांवे सातबारा झालाच नाही म्हणून या प्रलंबित मागणीसाठी धारेल येथील ग्रामस्थांनी सदरआंदोलन केले असता तहसीलदार यांनी आश्वासन देवून आंदोलनाची सांगता केली . सदर आंदोलन हे एस.पी. हेरोळे जिल्हाध्यक्ष आणि दलित आदिवासी पँथर सेनेचे महाराष्ट्राचे नेते अशोक तिडके यांचे मार्गदर्शनात करण्यात आले होते . आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा रेल धारेल तथा या परिसरातील जमीन अतिक्रमण धारक यांनी दिला .