बोर्डी(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे नायब तहसीलदार राजेश गुरव व बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांनी जप्त करुन दिलेला अवैध रेतिचा ट्रक्टर पोलिस पाटील यांनी कारवाई होण्याच्या आधीच सोडुन देवून पदाचा दुरुपयोग केला या बाबत बोर्डी मधुन जिल्हाधिकारी,पालकमंत्री,यांचेकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.त्याची दखल घेत उपविभागिय अधिकारी अकोट यांनी तहसीलदार अकोट यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्या बाबत लेखी पत्र दिले होते.त्या पत्राप्रमाणे तहसीलदार गिते अकोट यांनी प्रकरणात सविस्तर चौकशी करुन पोलिस पाटील प्रकाश उगले यांनी रेतीचा ट्रक्टर परसस्पर सोडुन कर्त्यव्यात कसूर केला असुन सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर असुन बोर्ड़ीचे पोलिस पाटील यांना निलंबित करण्यात यावे असा अहवाल उपविभागीय अधिकारी अकोट यांचेकडे सादर केला आहे.परंतू उपविभागीय अधिकारी सुरंजे यांची बदली झाल्यामुळे प्रकरण पेंटीग होत.आता नव्यानेच रुजू झालेले देशपांडे यांनी प्रकरणाची त्वरित दखल घेवून नायब तहसीलदार राजेश गुरव,अर्जदार देवानंद खिरकर,गैरअर्जदार प्रकाश उगले पोलिस पाटील बोर्डी या तिघांनाही सुनावणी करीता दि.19/10/2020 ला 12 वाजता उपविभागिय अधिकारी कार्यालय अकोट येथे हजर राहावे,अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी नोटिस बजावण्यात आली आहे.तरी आता उपविभागिय अधिकारी अकोट हे प्रकरणात सुनावणी घेवून गैरअर्जदार यांचेवर काय कारवाई करतात याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.