अकोला : पोलीस मुख्यालय अकोला येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार राजु नथ्थुजी खेडकर यांना कर्तव्य पार पाडत असतांना कोविड -१९ या रोगाची लागण झाल्यामुळे त्यांना उपवाराकरीता शासकिय महाविद्यालय अकोला या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. नमुद कर्मचारी हे दिनांक २१.०९.२०२० रोजी शासकिय महाविद्यालय अकोला येथे उपचारा दरम्यान कोविड -१९ या सांसर्गिक रोगामुळे मृत्यु झाला होता. कर्तव्य पार पाडत असतांना कोविड -१९ या सांसर्गिक रोगाची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह सहाय मंजुर करणेबाबत शासन निर्णय झाला आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस दलातील कर्तव्य पार पाडत असतांना कोविड -१९ या सांसर्गिक रोगाची लागण झाल्यामुळे मृत पावलेले पोलीस हवालदार राजु नथ्थुजी खेडकर यांची पत्नी श्रीमती तेजस्वीनी राजु खेडकर यांना नमुद शासन निर्णयान्वये ५० लाख रुपये सानुग्रह सहाय मिळण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक सा. श्री जी श्रीधर यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत आवश्यक त्या सर्व बाबींची तात्काळ पुर्तता करुन प्रस्ताव मा. पोलीस महासंचालक सा. यांचे ठकार्यालयात मंजुरीकरीता सादर करुन पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने मा.पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन सदर प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आज दिनांक १५.१०.२०२० रोजी मा. पोलीस अधीक्षक सा. श्री जी. श्रीधर सा. यांचे हस्ते मृत पावलेले पोलीस हवालदार राजु खेडकर यांची पत्नी श्रीमती तेजस्वीनी राजु खेडकर यांना ५० लाख रुपयांचा चेक देवुन सानुग्रह सहाय प्रदान करण्यात आले आहे.