अकोला,दि.14(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 142 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 124 अहवाल निगेटीव्ह तर 18 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7898(6394+1343+161) झाली आहे. आज दिवसभरात 37 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40886 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39844 फेरतपासणीचे 209 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 833 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40760 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34366 तर पॉझिटीव्ह अहवाल 7898(6394+1343+161) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 18 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील तीन जण, अकोट व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित कान्हेरी सरप, कृषि नगर, शिवनी, हिसपूर ता.मुर्तिजापूर, सागर कॉलनी, संतोष नगर, दहीहांडा ता. अकोट, फडके नगर व छोटी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुष असून ते गोकुल कॉलनी व कैलास नगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
37 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 25 जणांना, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, आर्युवेदिक हॉस्पीटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून सहा जण, तर हॉटेल स्कायलार्क येथून दोन जणांना अशा एकूण 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
374 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7898(6394+1343+161) आहे. त्यातील 260 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7264 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 374 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.