अकोला (प्रतिनिधी)– स्थानिक एलआरटी महाविद्यालया शेजारील असलेले बिहाडे मॅटर्निटी हॉस्पीटल हे नुकतेच डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल म्हणून रूग्णसेवेत रूजू झाले आहे. सदर रूग्णालयात २२ खाटांचे व्यवस्थापन असून त्यासोबतच ऑक्सीजन, हायफ्लो ऑक्सीजन, वेंटीलेटर, सेंट्रल ऑक्सीजन सिस्टम, ऑक्सीजन पोर्ट, बायपॅप मशीन यासारख्या अद्यावत सुविधा उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.
शहरात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस होणारी वाढ बघता तसेच रूग्णांच्या प्रमाणात बेड उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने नुकतेच बिहाडे मॅटर्निटी हॉस्पीटलला कोविड केअर हॉस्पीटल म्हणून घोषीत केले. सदर रूग्णालयात कोविड रूग्णांकरिता लागणाऱ्या सर्व अद्यावत सुविधांचा समावेश असून त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सीजन, हायप्लो ऑक्सीजन, वेंटीलेटर, सेंट्रल ऑक्सीजन सिस्टम, ऑक्सीजन पोर्ट, बायपॅप मशीन या सुविधा असणार आहेत. २२ खाटांचे व्यवस्थापन असलेले सदर रूग्णालयात चोवीस तास वैद्यकीय सुविधा असणार असून या रूग्णालयात कोविड रूग्णांच्या उपचाराकरिता शहरातील नामांकीत डॉक्टरांची फळी असणार आहे.
डॉ.एस.एस. काळे, डॉ. विजय बिहाडे, डॉ. अमोल रावणकर, डॉ. ऋषीकेश कडू, डॉ. राम बिहाडे, डॉ. अतुल बिहाडे, डॉ. शितल बिहाडे, डॉ. अजय बिहाडे, डॉ. अश्विन बिहाडे अशा ९ डॉक्टरांची टीम येथे कोविड रूग्णांचा उपचार करणार आहेत. सदर रूग्णालय ह अद्यावत असून येथे अनुभवी डॉक्टरांची टीम असल्याने कोविड रूग्णांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होणार आहे