अकोट(देवानंद खिरकर)- अकोट व तेल्हारा तालूक्यात राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कुषी संजविणी प्रकल्प अंतर्गत एकात्मिक शेती पध्दती घटका अंतर्गत शेळीपालन योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्या मुळे या प्रकरणा च्या चौकशी साठी युवासेना महाराष्ट्र विस्तारक राहूल रामाभाऊ कराळे यांनी मा.कुषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांची भेट घेतली.
अकोट व तेल्हरा तालूक्यात कुषी विभागा मार्फत नानाजी देशमुख कुषी संजविणी प्रकल्प अंतर्गत सन २०१८-१९ पासून सुरू झाल असून प्रकल्प क्षेत्रातील गाव समुहा मधील रोजगार उपलब्ध करून भुमिहीन व्यक्ती, विधवा महिला, अनुसुचित जाती, जमाती मधील महिला शेतकऱ्याना स्वयंमरोजगार उपलब्ध करून शेतीपूरक व्यवसायास चालना मिळावी या उद्देशाने शासनाने हि सुरू केली असून या योजने अंतर्गत खूप शेतकऱ्याना लाभ देण्यात आला. पंरतू यातील ९०% शेतकरी बनावट कागदपत्रे व कुठल्या हि प्रकारे शेळ्या न घेता या योजनेचा फायदा घेतला आहे. यात शेळ्या घरेदी समिती, कुषी साहाय्यक, कुषी पर्यवेक्षक, प्रकल्प साहय्यक व तालूका पशुसंवर्धन अधिकारी यांनी सगमत करून शासनाचा करोडो रूपयांचा अपहार केला आहे. यातील शेळ्या खरेदी समिती, कुषी साहाय्यक, कुषी पर्यवेक्षक, प्रकल्प साहयय्क, व तालूका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कुठल्या हि प्रकारच्या शेळ्या विकत न घेता व्यापाराच्या शेळ्या विकत घेऊन करोडो रूपयांचा लाभ घेतला आहे.या मध्ये मुख्य भुमिका साहाय्यक कुषी अधिकारी यांची असून त्यांनी शेळ्या खरेदी केल्याचे अहवाल दाखल केले आहेत.या सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी लाभार्थी कडून ५०% रक्कम घेऊन हा लाभ दिला आहे.हे सर्व प्रकरण उकडकीस आणण्यासाठी युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांनी कुषी मंत्री महाराष्ट्र राज्य श्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवेदन दिले.कुषी मंत्र्यांनी हा विषयी गंभीरत्याने घेत या वर चौकशी करण्याचे आदेश प्रकल्प उपसंचालक पोकरा यांना तपासणी साठी दिले.