• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोकभावना लक्षात घेत वाढीव वीजबिलासंदर्भात दिलासा देण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 14, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
वीजबिल
15
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : ‘लॉकडाऊन’ काळात जनतेने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरी राहण्यास प्राधान्य दिले.  हातावर पोट असणाऱ्यांचा या काळात रोजगार बुडाल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.  जून मध्ये वीज वितरण कंपन्यांकडून वाढीव देयके देण्यात आल्याने अशा कुटुंबांच्या अडचणींत वाढ झाली. शासनाने यासंदर्भात हस्तक्षेप करून सर्वांना दिलासा द्यावा आणि  देयकांची रक्कम कमी करावी अशी लोकभावना असून या लोकभावनेची दखल घेवून कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत, वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करून, वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे यावेळी स्पष्ट केले.

कोरोना टाळेबंदीच्या काळात मुंबईसह राज्यात आलेल्या वाढीव वीजबिलांसंदर्भात विधानभवन येथे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उपसचिव प्र.पु. बंडगेरी, यांच्यासह राज्य महावितरण कंपनी, बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम, अदानी आणि टाटा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

राज्य शासनाच्या सूचनेनुसार वीज पुरवठा खंडीत करण्यात आला नाही. तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित देण्यात आल्याने ही दरवाढ समजण्यात येत आहे. वीज वितरण कंपन्यांनी प्रत्यक्षात जादा आकारणी केलेली नाही. ग्राहकांना वीज बिल हप्त्यांवर भरण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याचबरोबर जनजागृती करण्यासाठी वेबीनारचे आयोजन करण्यात आले. टाळेबंदीच्या काळात ज्या ग्राहकांनी ऑनलाईन मीटरचे रिडींग पाठवले त्यांना त्या रिडींगप्रमाणे वीज देयके पाठविण्यात आली. तसेच एकरकमी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सवलतही देण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातही वीज खंडीत करण्यात आली नाही. तसेच, जास्तीत जास्त ग्राहकांनी थकित वीज बिल द्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे वीज वितरक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.
ऊर्जामंत्री यांनी विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या लोकभावनेच्या मुद्द्यांची दखल घेऊन वाढीव वीज बिल दरात सवलत देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले.

Tags: वीजबिल
Previous Post

अकोट ग्रामीण पोलिसांची समयसूचकता अन अवघ्या आठ तासात चोरटा मुद्देमालासह गजाआड

Next Post

महा.परीट(धोबी)सेवा मंडळ अकोट तालुका कार्यकारणी गठीत….

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
अकोट

महा.परीट(धोबी)सेवा मंडळ अकोट तालुका कार्यकारणी गठीत....

नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव आमंत्रित,स्‍थानिक महिला स्‍वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्‍य .

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.