अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 166 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच अकोट येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे एकाची चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 41 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 73 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 25 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 166 चाचण्यांमध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 19290 चाचण्या झाल्या त्यात 1388 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.