• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

170 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 47 डिस्चार्ज, चार मयत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 170 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 137 अहवाल निगेटीव्ह तर 33 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज चार मयत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7866(6376+1335+155) झाली आहे. आज दिवसभरात 47 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 40702 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 39665 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 829 नमुने होते. आजपर्यंत एकूण 40618 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 34242 तर पॉझिटीव्ह अहवाल 7866(6376+1335+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 33 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदासपेठ येथील तीन जण, तर उर्वरित मोठी उमरी, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जिल्हा परिषद कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील माना, मोठी उमरी व अधिकारी निवास सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन जण, मुर्तिजापूर व शिवर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, जउळका, तेल्हारा, सावरगाव, शिर्ला, फडके नगर, देवराव बाबा चाळ, लहान उमरी, गिता नगर, वृंदावन नगर, तळेगाव बाजार व हिरवखेड येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

47 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 31 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून चार जण, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, तर हॉटेल रिजेन्सी येथून एक जणांना अशा एकूण 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात खडकी खदान येथील 64 वर्षीय पुरुष असून ते 12 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, सिव्हील लाईन येथील 30 वर्षीय महिला असून ती 5 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, बार्शीटाकळी येथील 56 वर्षीय पुरुष असून ते 9 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर कापशी ता. पातूर येथील 54 वर्षीय पुरुष असून ते 10 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

379 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7866(6376+1335+155) आहे. त्यातील 260 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7227 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 379 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अहवाल पॉझिटीव्ह
Previous Post

उद्धवा दार उघड, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 166 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 166 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

जिल्हाधिकारी

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटीत कामगारांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.