म्हैसांग (निखिल देशमुख)-येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे तेच पाण्याच्या टाकीवर लाखो रुपये खर्च करून ही योजना रखडली आहे. ही टाकी भरून गावात कधीही पाणीपुरवठा होत नसल्याने म्हैसांग येथे अजूनही 15 दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जातो. बायपास करून गावात पिण्याचे पाणी सोडल्या जाते त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचत नाही. महिलांना पिण्याच्या पाण्याची मोठी कसरत करावी लागत आहे खारपण पट्यात गाव असल्यामुळे गोड पाण्याची समश्या अनेक वर्षापासून म्हैसांग येथील नागरिकांना आहे ही पाण्याची टाकी सुरु करूनच गावात पाणीपुरवठा करावा असे पंचायत समिती सदस्य आनंद डोंगरे यांना पाहणी करतांना सांगितले.
आणि गावातील नागरिकांची पण मागणी आहे. आणि अक्षय पिपरे, रितेश काळे, निखिल देशमुख, गोपाल नवलकार, निखिल कोगदे, विशाल नवलकर, तुकाराम काळे, संदीप वानखडे, पंकज काळे, अनिकेत उंबरकर, किसना नवलकर, अविनाश भामोद्रे, यांनी देखील मागणी केली आहे.