बोर्डी (देवानंद खिरकर)- दि 11/10/2020 रोजी अकोलखेड पठार नदी पात्रालगत असलेल्या सरकारी ईक्लास मधील सरकारी गौण खणींज 10 ब्रास रेती किंमत अंदाजे 30000/- ची निनावी जप्त करण्यात आली आहे.आणि ग्राम पंचायत अकोलखेड च्या रेती सुपूर्द करण्यात आली आहे.तलाठी रावनकार,कोतवाल नारायण सरपंच, पोलीस पाटील,यांचे समवेत मंडळ अधिकारी,निळकंठ नेमाडे यांनी ही कारवाई केली आहे.नव्यानेच रुजू झालेले मंडळ अधिकारी नेमाडे हे उमरा मंडळला रुजू होताच त्यांनी अवैध रेती चोरा विरुध्द धडक कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.व यापुढे सुध्दा अशीच धडक कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहीती नेमाडे यांनी दिली आहे.रेती चोरा विरुध्द गोपनीय माहीती द्यावी माहीती देनार्याचे नाव सुध्दा गोपनीय ठेवण्यात येणार आहे.अशी माहीती आज उमरा मंडळ अधिकारी नेमाडे यांनी दिली आहे.या आधी सुध्दा अकोटला असतांना मंडळ अधिकारी नीळकंठ नेमाडे यांनी अवैध रेती चोरी विरोधात कडक कारवाया केल्या होत्या.आता उमरा मंडळ मधे जवळपास सर्वच गावात नदी पात्रातुन,नाले मधुन रात्रिला खुलेआम रेतिच्या चोर्या सुरु आहेत.या बाबत तलाठी यांनी पूर्णपणे माहिती असुन सुध्दा कारवाया होत नाहीत.तरी आता या रेती चोरीला मंडळ अधिकारी नेमाडे हेच कडक लगाम लावू शकतील अशी मागणी होत आहे.