पातूर (सुनिल गाडगे) : तालुक्यातील आस्टूल येथील तत्कालीन ग्रामसेविका जामकर यांनी त्यांच्या कारकीर्द मध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याचि तक्रार सामाजिक कार्यकर्ते मंगेश इंगळे यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे तक्रारीत ग्रामसेविका जामकर यांनी चौदाव्या वित्त आयोगातुन बेचालिस हजार रुपयाचे स्यानिटायजर खरेदी केले परंतु हि खरेदी केवळ कागदावर दाखविण्यात आली असून हि खरेदी करीत असतांना इतर कोणतेही कंपनीचे किंवा विक्रेत्याचे कोटेशन मागवन्यात आले नाही तसेच याच योजनेतुन सात हजार रुपयाचे महिलांना साठी प्याड चि खरेदी सुद्धा कागदोपत्री दाखवीन्यात आले असून यात जि स टी चे बिल सुद्धा लावण्यात आले नसून किंवा इतर विक्रेत्या चे कोटेशन घेण्यात आले नाही आणि योग्य विक्रेत्या कडून खरेदी करण्यात आले नाही तसेच चौदा वित्त आयोगातुन महिलांसाठी कागदोपत्री ब्युटी पार्लर प्रशिक्षण दाखवीन्यात आले या प्रशिक्षनाचे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये फोटो किंवा हजेरी रजिस्टर उपलब्ध नाही तसेच प्रशिक्षण संस्था ब्युटी पार्लर प्रशिक्षण साठी मान्यता प्राप्त नसून संस्थेला पासष्ट हजार रुपया चा चेक सुद्धा देण्यात आला तसेच संस्थेने सुद्धा जि स टी ची कुठलीही पावती घेण्यात आली नाही तथा कोटेशन सुद्धा मागविले नाही यल इ डी खरेदी केली असता इतर दुकानदारा कडून कोटेशन घेण्यापूर्वी फुलारी इलेक्रिक्कस या विक्रेत्या कडून पुरवठा करण्याचि ऑर्डर देण्यात आली आणि नंतर इतर विक्रेत्या कडून कोटेशन घेण्यात आले तसेच सामान्य फंडा मध्ये ग्रामसेविका जामकर यांनी चक्क खाते न उचलता दोन हजार तीनशे साठरुपये खर्च दाखवीन्यात आला खाते उचलने बाबत कोणतीही पूर्व सूचना दिलेली नसून किंवा कोणतीही नोटीस बजावन्यात आलेली नाही दोन हजार तीनशे साठ रुपयाचे अनावश्यक खर्च दाखवून असा लाखो रुपया चा अपहार ग्रामसेविका जामकर यांनी केला असून एवढ्या वरच ग्रामसेविका जामकर यांचा प्रताप थांबला नसून जामकर यांनी सहा महिन्यात सोळा हजार सातशे रुपयाचे सी फ ल लाईट खरेदी केली या लाईट चि एक वर्ष ग्यारंटी असताना सदर ची खरेदी दोन वेळा करून अपहार करण्यात आला तसेच कोटेशन व जि स टी सुद्धा बिलात नसून इतर कामाचे सामान्य फंडातुन दाखवीन्यात आले असून मजूर लोकांचि मजुरी रजिस्टर वर तसेच मस्टर ग्रामपंचायत ला उपलब्ध नाही तसेच नऊ हजार सातशे पन्नास रुपया चे बिल उपलब्ध नसतानाही सदर चे बिल काढण्यात आले असून ग्रामसेविका जामकर यांनी त्यांच्या कारकीर्दित लाखो रुपयाचि माया जमवून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावला असून ग्रामसेविका जामकर यांच्या वर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश इंगळे यांनी तक्रारीत केली असून याबाबत ग्रामसेविका जामकर यांना विचारले असता त्यांनी तक्रार माझ्या पर्यंत पोहचली नसून तक्रार आल्यावर प्रतिक्रिया देऊ असे म्हटलं