वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी कोरोना महामारीसाठी पुन्हा एकदा चीनला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटलंय की, चीनने जगासोबतच जे केलं आहे, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी चीनवर आरोप केले. ते म्हणाले की, कोरोना महामारीसाठी चीन जबाबदार आहे. याची त्यांना किंमत चुकवावी लागेल. यामध्ये अमेरिकन नागरिकांची कोणतीही चूक नाही.
कोरोना संसर्गानंतर रूग्णालयात तीन दिवसांच्या उपचारानंतर ट्रप्म पुन्हा व्हाईट हाउसमध्ये परतले. यानंतर लगेचच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये त्यांनी मी कोरोना संसर्गानंतरही ठीक आहे. आता बरे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना ट्रम्प यांनी जगावर कोरोना लादण्यात चीनच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच मला कोरोनामध्ये ज्या प्रकारे उपचार देण्यात आले. त्याच प्रकारे अमेरिकन नागरिकांनाही उपचार दिले जातील. तसेच यावरील औषध मोफत दिले जाणार असून, यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागणार नाहीत, असे ते म्हणाले.
कोरोना लसीबाबत बोलताना ट्रम्प यांनी लवकरच आपल्याला कोरोनावरील लस मिळणार आहे. मला वाटते की, निवडणुकांआधी आपल्याला लस मिळायला हवी, यावर राजकारण होत आहे. विरोधक यावर राजकारण करत असतील तर त्यांना करू देत. मात्र कोरोनावरील लस निवडणुकाआधी मिळायला हवी, असं त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी व्हाईट हाउसमध्ये आल्यानंतर तोंडाला मास्क लावला नाही. तसेच तोंडावर आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारसाठी ट्रम्प आग्रही असल्याचे बोलले जात आहे. कोरोना संसर्गामुळे तीन दिवस रूग्णालयात काढावे लागल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रचारासाठी आग्रह धरला आहे. मात्र कोरोनाबाधित ट्रम्प यांच्या प्रचारावर मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. यामुळे त्यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमातही बदल करण्यात येत आहेत.