तेल्हारा(प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशमधील हाथरस या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मनीषा वाल्मिकी नावाच्या 19 वर्षीय तरुणीला मारहाण करून 19 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये, म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक 29 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झालेला आहे या अमानविय घटने चा निषेध नोंदवत दोषींना त्वरित अटक करून योग्य कारवाई करावी अशी मागणी दि. 5 सप्टेंबर रोजी संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशन ने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली
सादर निवेदनाचा आशय असा की देशातील सर्व सहकाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन हाथरस हत्याकांड प्रकरणातील मनीषा वाल्मिकी यांच्यासह देशभरातील सर्वच जाती अत्याचारावरील त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, व या गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी या दोषींवर कारवाई या दोषींवर कठोर कारवाई व्हावी असे निवेदन नमूद असून या निवेदनावर संत रविदास चर्मकार फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष प्रितम चिमणकर, गजानन भाऊ गव्हाळे, विनोद डामरे, सागर गव्हाळे. श्रीकृष्ण डामरे, रोशन गवई , सागर डांगे, संजय चिमणकर आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत