पातुर(सुनील गाडगे)- अकोला जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायती मध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत लवकरच ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजु शकतो त्या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज तालुका मेळाव्याची सुरुवात पातुर पासुन केली. आज पातुर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजीत करून ग्रामपंचायत निवडणूक पुर्व तयारी संदर्भात नियोजन करण्यात आले. आज पातुर तालुक्यातील जवळपास ७०% ग्रामपंचायत वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत त्या कायम राखून त्यात वाढ कशी करता येईल या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत आपल्या जवळ असली पाहिजे आता ७०% नाही तर १००% ग्रामपंचायतीवर वंचीत चाच झेंडा असला पाहिजे त्यासाठी पक्षाने सर्व तयारी करावी असे प्रदिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांनी केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या मेळाव्यात जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, उपाध्यक्ष हिरासिंग राठोड, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी सभापती पंजाबराव वढाळ, महिला महासचिव शोभाताई शेळके, जि प समन्वय समिती सदस्य दिनकरराव खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजित गवई, जिल्हानेते अशोकराव शिरसाट, सुरेश शिरसाट, जि प सदस्य विनोद देशमुख, सुनील फाटकर, तालुका महासचिव डॉ ओमप्रकाश धर्माळ, राजु बोरकर, महल्ले साहेब, प स सदस्य पती अर्जुन टप्पे, विष्णु डाबेराव, मेजर ईंगळे, दिनेश गवई, शरद सुरवाडे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉ ओमप्रकाश धर्माळ यांनी प्रास्ताविक ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर आभार राजु बोरकर यांनी मानले, यावेळी उपस्थित सर्वांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थितां कडुन सुचना सुद्धा स्विकारल्या.