दहिगाव अवताडे (प्रतिनिधी)-
दहिगाव शिवारात बिबट असल्याच्या शक्यतेचा आधारावर वन विभागाने त्याला टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते.दुसऱ्या दिवशी ते कॅमेरे तपासले असता त्यातील एका कॅमेर्यात मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीचा अर्धा चेहरा दिसत आहे.आणि त्याच कॅमेऱ्याची दिशाही बदललेली दिसून आली.त्यामुळे ती व्यक्ती कोण याचा तपास वन विभागाने लावणे गरजेचे होते.पण तसे न झाल्याने ते गुलदस्त्यात ठेवण्या मागचे कारण काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे शिवारात दि.18 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास मुख्य रोडवर बिबट्या आढळून आला होता.तेव्हापासून पंचक्रीशीतील समस्त शेतकरी धास्तावले आहेत.शिवाय 25 सप्टेंबर रोजी एक मोठ्या हरिणाची दहिगाव फाट्याच्या आसपास शिकार झालेली आढळून आली होती.त्यामुळे अकोला तथा आकोट वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.त्याठिकाणी सापडलेल्या पावलांवरून ती शिकार बिबट्यानेच केली असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.त्यामुळे त्याची क्षणचित्रे टिपण्यासाठी वन विभागाने शिकार झालेल्या परिसरात संध्याकाळच्या सुमारास दोन ट्रॅप कॅमेरे लावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन कॅमेरे लावण्यात आले होते.दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कॅमेरे तपासले असता त्यातील एका कॅमेऱ्यात मध्यरात्री 1.47 मिनिटांनी एका व्यक्तीच्या चेहरा त्याने टिपला.आणि त्याच वेळेपासून त्या कॅमेऱ्याची दिशा निंबाच्या झाडाच्या शेंड्यावर पालटविण्यात आली.त्यामुळे त्या ठिकावरून जर बिबट खरोखरच गेला असेल तर त्याला तो टिपू शकला नाही.परंतु या ठिकाणी प्रश्न हा निर्माण होते की त्या कॅमेऱ्याच्या समोर एवढ्या रात्री आलेली ती व्यक्ती कोण, त्या ठिकाणी ती कशाकरिता आली असेल.शिवाय कॅमेऱ्याची दिशा कोणी व का बदलविली असेल याचा तपास वनविभागाने लावणे गरजेचे होते.परंतु तसे झाले नाही.आणि वनविभागाने ते जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही केवळ कोणीतरी कॅमेऱ्याची दिशा बदलून टाकली म्हणून वन विभागाने त्याची कोणतीच किंवा चौकशी न करता प्रकरण थंडबसत्यात ठेवले.एकीकडे बिबट्या असल्याच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तवले आहेत तर दुसरीकडे ती व्यक्ती कोण या प्रकारामुळे शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
———————————————पहिल्या दिवशी लावलेले ट्रॅप कॅमेरे दुसऱ्या दिवशी तपासले असता ते पूर्णपणे बंद दिसून आले.पुन्हा त्याच संध्याकाळी लावलेल्या दोनपैकी एका कॅमेऱ्यात मध्यरात्री आलेल्या त्या व्यक्तीने कॅमेऱ्याची दिशा बदलून देण्यामागचे कारण काय? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
——————————————–
प्रतिक्रिया.
एकीकडे बिबट्याची दहशत,दुसरीकडे त्याला टिपण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्याची अज्ञात व्यक्तीने बदल केलीली दिशा.त्यामुळे तो अज्ञात व्यक्ती कोण याचा तपास लावणे गरजेचे होते.
पुरुषोत्तम इंगळे
शेतकरी.दहिगाव अवताडे.