तेल्हारा (प्रतिनिधी)– तेल्हारा नगर पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल धारक लाभार्थ्यांना नाहक त्रास दिला जात आहे तसेच आंधी मंजूर झालेले घरकुल जाचक अटी लावून नामंजूर करण्याचा डाव आखल्या जात असल्या बद्दल . पालिकेच्या बेजबाबदार पनाचा पुराव्यानिशि पर्दाफाश करण्यात येऊन घरकुल धारकांना पालिके कडून होणारा त्रास शिवसेना खपवुन घेणार नसून घरकुल धारकांच्या न्याय हक्का साठी उद्या शिवसेना व युवासेनेच्या वतीने तेल्हारा पालिकेत आंदोलन करू अशी घोषणा स्थानिक विश्राम गृह येथे ४ ऑक्टोबर ला शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड़ यांनी केली .
शिवसेना ८०टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारी संघटना आहे त्यामुळे निश्चित पने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे . तेल्हाऱ्या मध्ये ज्यांच्या कड़े घराची खरेदी आहे , स्वतःचे घर असल्याचा पुरावा आहे जे घर टक़्स भारतात तसेच नगर नगरपालिकेने ज्यांच्या कडून अर्ज मागवून घेऊन आपले पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले असल्याचे पत्र दिले अश्या सर्वाना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी ही पालिका अधिकारी व पदाधिकारी यांची होती परंतु तसे झाले नाही. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तेल्हारा शहरातील बहुतांश लाभार्थ्यंना नगर पालिके अंतर्गत अद्याप लाभ मिळाला नाही . पालिकेने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अनेकांजवळून अर्ज भरून घेतले . व त्यांना आपले घरकुल मंजूर झाल्या बाबत चे पत्र सुद्धा दिले आहे परंतु सदर पात्र लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत योग्य ती कार्यवाही करून लाभ दिला नाही उलट अधिक काही अटी व शर्थी टाकून त्यांचे घरकुल नामंजूर करण्याचे षडयंत्र पालिका अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी आखले आहे. १७ महिन्या नंतर पुन्हा जाचक अटीचे पत्र देण्याचे प्रयोजन काय? , १७ महीने पालिका झोपी गेली होती काय ? या बाबत प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने पत्रकार परिषदेत दोन्ही पत्र दाखवून पालिकेच्या बेजबाबदार पनाचा पुराव्यानिशी पर्दाफाश केला आहे . त्यामुळे ते पात्र लाभार्थी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल पासून वंचित राहत आहेत हा त्यांच्यावर अन्याय होत आहे . NA करण्याचा अधिकार मुख्याधिकारी यांना आहे या संदर्भात नगर पालिकेने सात महिन्या पूर्वी विषय पत्रिकेवर विषय घेतला होता परंतु नगराध्यक्ष यांनी तसा ठराव घेऊन ठरावाची अंमलबजावणी केली नाही ठराव अधिकाऱ्यानं पर्यत पोहलाच नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे . या वरुन ग़रीबांचे काम करण्यात नगराध्यक्ष किती बेजबाबदार आहेत हे दिसून येते कारण दोन दिवसापुर्वीच आमच्या कार्यकर्त्यांनी संबधित अधिकाऱ्याना तसे विचारले होते . पंतप्रधान घरकुल योजनेत सदर पात्र लाभार्थ्यांनी पालिकेच्या सुचेने नुसार अर्ज भरण्याकरिता अर्जाचा खर्च ,नकाशे काढण्याकरिता खर्च हे सर्व करताना त्यांना झालेला मानसिक आर्थिक त्रासामुळे सदर लाभार्थीचे खच्चीकरण झाले आहे .त्यामुळे ग़रीबांच्या पाठीशी शिवसेना खंबिर पने उभी राहणार असून घरकुल धारकांच्या न्याय हक्का साठी ७ ऑक्टोबरला शिवसेना व युवासेनेच्या वतीने तेल्हारा नगर पालिके मध्ये आंदोलन करणार असल्याची घोषणा शिवसेना तेल्हारा तालुका विजय मोहोड़ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली . या वेळी शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे , माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के , राजेश वानखड़े , युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे , माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर , युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे , विवेक खारोडे , स्वप्निल सूरे ,गौरव धुळे, रहेमान शाह ,शाम माहुरे ,गजानन मोरखडे इत्यादि शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होती .
पाण्या बाबत शिवसैनिकानि स्टिंग ऑपरेशन करून पालिकेचे पितळ उघड़े पाडले होते.
तेल्हारा शहरात गढुळ पाणी कुठून येते याचा शिवसैनिकांनी शोध घेऊन जलशुद्धि केन्द्रावर जाऊन तेथे किती सुविधांचा अभाव आहे हे स्टिंग ऑपरेशन द्वारे पालिकेच्या निदर्शनास आणून देऊन पालिकेच्या बेजबाबदर पनाचा पर्दाफाश केला होता हे पालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यानी लक्षात ठेवावे. तेल्हारा पालिकेच्या विकास कामांबद्दल होत असलेले भष्ट्राचाराचे आरोप , निविदा प्रक्रियेतिल घोटाळा हा सर्व प्रकार गंभीर आहे पालिकेचा कारभार जर पारदर्शक असेल तर शासकीय नियमानुसार चौकशी समिति नेमुन विनाविलंब तपास करून नागरिकांचे समाधान करावे तसेच ना ठेका , ना ठेकेदार , ना खाएंगे , ना खाने देंगे अश्या खोट्या घोषणा करून सत्ता हस्तगत करणारे काय करीत आहेत हे जनतेला माहितच आहे.ग़रीबांना त्रास देण्याचा प्रकार चालूच राहिला तर पुढचे स्टिंग ऑपरेशन हे पालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांना माहा गात पडेल असा इशारा सुद्धा शिवसेनेने पत्रकार परिषदेत पालिकेला दिला आहे .