अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 69 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 65 अहवाल निगेटीव्ह तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज सात मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7645 (6225 +1265+155) झाली आहे. आज दिवसभरात 185 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39787 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38803 फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 776 नमुने होते. आजपर्यंत एकूण 39302 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 33077 तर पॉझिटीव्ह अहवाल 7645 (6225 +1265+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज चार पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील रामदास पेठ, जयहिंद चौक, देवराव बाबा चाळ येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते पुरुष असून जीएमसी रहिवासी आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 21 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
53 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 15 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून सहा जण, युनिक हॉस्पिटल येथून एक जण, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, अकोला अक्सिडेंट क्लीनिक येथून तीन जण, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून चार जण, हॉटेल स्कायलार्क येथून एक जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले22 जणांना, अशा एकूण 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
832 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7645 (6225 +1265+155) आहे. त्यातील 244 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6569 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 832 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.