अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यामध्ये कोविड-19 आजारासंबंधीत ज्या व्यक्तींना कोरोना विषाणुचा संसर्ग होवुन गेला व त्यांना आपल्याला कोविड आजार होवुन गेला हे सुद्धा कळले नाही. या करीता सीरो सव्हीलर्न्से जिल्हा प्रशासन अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्वजनीक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला होता. या सीरो सर्हीलन्समध्ये अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकुन 2975 व्यक्तींचे रक्त नमुने नमुना निवड पद्धतीने घेण्यात आले. ज्या व्यक्तींना या अगोदर कोविड या आजाराची लागन झालेली आहे, अशा व्यक्तींचा समावेश सीरो सर्व्हीलन्समध्ये करण्यात आलेला नव्हता.
या सर्व्हेमध्ये दि. 7 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2020 पर्यंत व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आले. या पैकी शहरी विभागातुन एकुन 1105 रक्त नमुने, तर ग्रामीण विभागातुन एकुन 1970 रक्त नमुने जमा करण्यात आले. कोविड आजाराची लागन होण्याची शक्यता अधिक असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार इत्यादी गटामधुन देखील एकुन 335 रक्त नमुने घेण्यात आले. त्यानंतर या सर्व रक्त नमुण्यामधुन कीती रक्त नमुण्यामध्ये कोविड आजाराच्या संबंधीत अॅन्टीबॉडी(प्रतीजैवीके) आढळली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील जिवरसायनशास्त्र विभागामध्ये तपासण्यात आले. एकुन 2975 रक्त नमुण्यापैकी 451 (15.16 टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैवीके) आढळली आहेत. याचा अर्थ की शंभर व्यक्तीमागे 15 व्यक्तींना कोविड आजाराची लागन होवुन गेली व त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आढळली व त्यांना कोवीडचा आजार होवुन गेला असे निर्दशनास आले.
संपूर्ण जिल्ह्यात एकूण 2975 रक्त नमुण्यापैकी 451 (15.16 टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैवीके) आढळली आहेत, ग्रामीण भागात एकूण 1970 रक्त नमुण्यापैकी 268 (13.60 टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैवीके) आढळली आहेत, शहरी विभाग एकूण 1105 रक्त नमुण्यापैकी 190 (17.19 टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैवीके) आढळली आहेत, तर अती जोखमीचा गटातील एकूण 635 रक्त नमुण्यापैकी 75 (11.81 टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैवीके) आढळून आली असल्याचे संशोधन अहवालामधुन निर्दशनास आले आहे. अजुनही बहुतांश जनतेला कोविड-19 या आजाराची लागण झालेली नाही त्यामुळे पुढील काळात बहुतांश लोकांना कोविड-19 आजाराची लागन होण्याची संभावना आहे. त्याकरीता स्वत:चे व कुटुंबाचे या आजारापासुन संरक्षण करण्याकरीता नागरीकांना सर्वोतोपरी खबरदारी घेण्याचे, आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.