अकोला – कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १८९ चाचण्या झाल्या त्यात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही,अकोला आयएमए येथे ६८ चाचण्या झाल्या त्यात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे ६१ चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात १८९ चाचण्यांमध्ये २१ अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत १७९९७ चाचण्या झाल्या त्यात १२९६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.