अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १८९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६४ अहवाल निगेटीव्ह तर २५ अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाला.
त्याच प्रमाणे काल (दि.३) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ७६२०(६२२१+१२४४+१५५) झाली आहे. आज दिवसभरात १८६ रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३९७६२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३८७७०, फेरतपासणीचे २०८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७८४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३९२२४ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३३००३ तर पॉझिटीव्ह अहवाल ७६२०(६२२१+१२४४+१५५) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज २५ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील हिंगणा फाटा येथील चार जण, डाबकी रोड येथील दोन जण,तर उर्वरित पारडी, बार्शीटाकली, जवाहर नगर, मोठी उमरी, जीएमसी, गिरीनगर, मलकापूर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरित मूर्तिजापूर, जीएमसी, आदर्श कॉलनी, दानापूर ता. अकोट व पाथर्डी ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
एक मयत
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात बस स्टँड, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून तो १ ऑक्टोबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
१८६ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४४ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून नऊ जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच जण, युनिक हॉस्पिटल येथून एक जण, अवघते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक जण, अकोला अक्सिडेंट क्लीनिक येथून तीन जण, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक जण, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून तीन जण, हॉटेल स्कायलार्क येथून नऊ जण, कोविड केअर सेंटर, बार्सिटाकली येथून तीन जण, तर कोविड केअर सेंटर हेन्डज मूर्तिजापूर येथील ११ जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ९६ जणांना, अशा एकूण १८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
८६० रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ७६२०(६२२१+१२४४+१५५) आहे. त्यातील २४४ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ६५१६ संख्या आहे. तर सद्यस्थितीत ८६० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.