अकोला (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील हातरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवर त्याच गावातील उच्च जातीचा तरुणांनी सामुहिक बलात्कारकरून तिने आरोपीचे नाव सांगण्याची हिम्मत करू नये म्हणून तिची जीब देखील कापून काढली. तिच्यासोबत झालेल्या या भयावह, क्रूर, अमानुष बलात्कारामुळे आणि तिला वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या अडथळयांमुळे दि. ३० सप्तेम्बर २०२० रोजी तिचा मृत्यू झाला. अंतिम संस्काराच्या पूर्वी घरच्यांनी विनवणी करूनही तिचे दर्शन घेऊ दिले नाही आणि अंतिम संस्कारांच्या वेळी घरच्यांना व प्रेसला अंधारात ठेवण्यात आले.
सुरुवातीला आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास देखील पोलिस टाळाटाळ करत होते. या टाळाटाळी बद्दल सरकार विरोधात आवाज उठल्यानंतर खूप उशिरा गुन्हा दाखल केला. ही घटना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि पोलीस दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. या तरुणीला वेळेवर वैद्यकीय मदत देखील मिळाली नाही. अन्यथा तिचा जीव वाचू शकला असता. क्रूर अमानुष अत्याचाराची ही घटना आंणि त्यानंतर संपूर्ण शासन व्यवस्थेने तिला मदत देण्यासाठी केलेले असहकार्य, संपूर्ण देशाला आणि भारतीय राज्य व्यवस्थेला लज्जास्पद अशी घटना आहे.
या घटनेचा अकोल्यातील विद्याथ्यानी ०२ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी गांधीचा शांतीचा मार्गाने टावर चौक येथे पोस्टर घेऊन आणि कॅन्डल लाईट करून निषेद व्यत केला. या वेळी अमित तेलगोटे, अभिजित पाटील, अभिजित तेलगोटे, ऋषिकेश वानखडे, सनी इंगळे आणि अंकुश गावंडे उपस्तीथ होते.