अकोला : जिल्ह्यातील २१ पोलीस ठाण्यांपैकी अकोल्यातील MIDC अकोट शहर व मुर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नियोजन, कामाची गती या विविध १४ निकषांवर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आज महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने पोलीस
अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते अकोट शहर, MIDC पोलीस स्टेशन व माना पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना हे
प्रमाणपत्र देण्यात आले.उत्तम आणि दर्जेदार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना
आयएसओ (International organization for Standardization) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकन दिले जात होते. सेवा देणाऱ्या संस्थांनाही आता ते देण्यात येत
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच सर्व संस्थांना चांगले काम करून आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्याचे आवाहन केले होते. गंभीर गुन्ह्यांची प्रलंबित प्रकरणे ४० टक्क्यांपेक्षा कमी आहेत, नागरिकांशी बोलताना पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे आहे, नागरिकांना योग्य वागणूक मिळते का, कार्यालयातील
वाहनांची स्थिती कशी आहे, प्रसाधनगृह आहे का, नागरिकांनी केलेल्या ईमेल्सला कसा प्रतिसाद दिला जातो, कामकाजाच्या वेळी नियमांचे पालन होते का, सीसीटीव्ही कॅमेरे योग्य लावण्यात आलेले आहेत का
आदी बाबी तपासण्यात आल्या.