अकोला (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष – भारतीय महिला फेडरेशन – आयटक कामगार संघटना अकोला, महाराष्ट्रचे जिल्ह्यात 88 ठिकाणी कॉम्रेड रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्रेड सुनिताy पाटील कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करून १) मा. राष्ट्रपती, २) मा. पंतप्रधान, ३) मा. संजयभाऊ धोत्रे, भारत सरकार, केंद्रीय मंत्री, भारत सरकार नवी दिल्ली. तथा खासदार अकोला यांना मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला. त्यांच्यामार्फत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, आयटक कामगार संघटनने निवेदन पाठविण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की उत्तर प्रदेशामधील हाथरस येथील दलीत तरुणी मनीषा वाल्मिकी यांचा दिल्ली येथे मृत्यु झाला. काही दिवसा अगोदर सदर तरुणी गावातील विकृत मानसीकतेच्या संवर्णानी अनन्वित अत्याचार केले. तीची जीभ कापली तिला मारहाण केले आणि लैंगिक अत्याचार केले सदर घटनेचा वाच्यात्य झाला नाही पाहिजे म्हणुन तरुणीची जीभ कापली तिला मारहान करत लैंगिक अत्याचार केले. यांनतर तिचे कुटुंबिय पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेल्यावर त्यांची तक्रार सुध्दा वेळेत घेतली नाही. एवढेच नव्हेतर
वैद्यकीय उपचारही उशीरा केला खैरलांजी हत्याकांड दिवशी तिचा मृत्यु झाला या देशात आपले सरकार
स्थापन झाल्या पासुन देशात महिलांची असुरक्षितता अधिका अधिक वाढत चाललेली आहे. युपीचे
पोलीस प्रशासन युपी सरकार यांनी यामध्ये अत्यंत हलगर्जीपणा केलेला आहे. भारतीय महिला फेडरेशन,
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार संघटना या घटनेचा व देशात निकृष्ठ होत चाललेले प्रशासनाचा तीव्र निषेध करीत धिक्कार करीत आहे. या संपुर्ण प्रकरणात जबाबदार व्यक्तीना त्वरीत कडक शासन केले जावे व उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट प्रस्थापीत करावी या सह आम्ही खालील मागण्या करित आहो. की
१. मनीषा वाल्मिकीच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करुन मनीषा वाल्मीकीला न्याय
द्या.
२. मनीषा वाल्मिकीच्या कुटुंबियांना १० लाख रु. तातडीने मदत व संरक्षण द्या.
३. फास्ट ट्रॅक कोर्ट मार्फत मनीषा वाल्मिकी यांचा खटला चालवा आणि त्वरीत न्याय द्या.
३. योगी सरकारचा राजीनामा घेवुन युपी मध्ये राष्ट्रपती राजवट लागु करा.
अकोला. या निदर्शने आंदोलन
कॉ. रमेश गायकवाड कॉ. सुनिता पाटील कॉ. नयन गायकवाड सरोज मुर्तीजापुर कर मायावती बोरकर छाया वारके सुनिता वारके घायवट ताई सूर्यवंशी ताई नाहीसे ताई रामभाऊ वानखेडे जिल्ह्यातील शेकडो महिन्यांनी 28 ठिकाणी सदर आंदोलन केले असे जिल्ह्याच्या संघटक सुरेखाताई ठोसर आपले प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे