म्हैसांग(निखिल देशमुख)-दि.24 सप्टेंबर पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनला न जुमानता बाहेर गावातून मजूर आणून केले जनसुविधा 14 वित्त आयोग चे बोगस काम. अनेक कामावर एकच वेक्ती काम करायला असणे. त्याच वेक्तीला 3500 रुपये रोज देऊन कशे काम केले असेल एकीकडे मजलापूर गावात लोकांना काम नाहीत मजुरीच्या शोधात लोक फिरतात. 5 लाख रुपये कामगारांना कशाबद्दल दिले ते ग्रामसेवक यांना माहीतच नाही या पाच लाखाचा तर काहीच हिशोब नाही. रेती बंद असल्यानंतर रेती बिना परवाना आणली कशी आणि किमती पेक्षा जास्त पैसे देऊन ज्या बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स चे बिल आहे त्याच्या कडे साठवनूक परवाना आहे का. ग्रामपंचायत ला शासनाकडून आलेल्या निधीचा अपहार केला शासनाची व ग्रामपंचायत ची फसवनुक केली. मजलापूर गावातील काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा वारंवार देऊन ग्रामसेवक महिंद्र अहिर व त्याच्या सोबत असलेले भ्रष्टाचारी यांच्या वर कार्यवाही झाली नाही तर पंचायत समिती सदस्य आनंद डोंगरे सह ग्रामपंचायत सदस्य यांनी उपोषणास बसण्याची तयारी दाखविली आहे.