• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

देश आणि राज्यातील अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त, कसा होणार सामाजिक न्याय ? – राजेंद्र पातोडे

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 2, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
82 1
0
वर्क फ्रॉम होम
13
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई दि. २ – देश आणि राज्यातील अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त असून अनेक राज्यातील आणि राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या सल्लागार समित्या अद्याप नेमण्यात आल्या नाहीत.त्यामुळे देशात घडणा-या अनुसूचित जाती जमाती वरील अन्याय अत्याचारांना पायबंद घालणारी संवैधानिक यंत्रणाच अस्तित्वात नाही.ह्याला केंद्र आणि राज्यातील सरकर जबाबदार असून सामाजिक न्याय होणार तरी कसा ? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी उपस्थित केला आहे.

जातीय अत्याचाराचे बळी ठरणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याची धुरा केंद्र – राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगावर आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या आयोगाची राष्ट्रीय आणि राज्यातील अध्यक्ष पदे रिक्त आहेत.सोबतच अनुसूचित जाती जमातीच्या सल्लागार समित्यांच्या नियुक्त्या देखील रखडलेल्या आहेत.ह्या पूर्वी गठीत केल्या आयोगाला सध्या पुरेसे मनुष्यबळ वाहने नव्हती, सदस्यांच्या जागाही रिक्त ठेवण्यात आल्या होत्या.निधी सुद्धा मोठी उपलब्ध केला जात नव्हता.सामाजिक न्याय विभागाने अक्षरश: बेदखल करून ठेवला आहे.देश आणि राज्यात दरवर्षी हजारो जातीय अत्याचारांची प्रकरणे नोंद होतात.शासकीय यंत्रणेने दखल न घेतलेली सुमारे हजार प्रकरणे प्रतिवर्षी अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे येत असतात. सध्या हा आयोग अडगळीत पडला आहे. एक अध्यक्ष आणि चार सदस्य अशी आयोगाची रचना असलेल्या राज्यातील अध्यक्षासह बहुतांश पदे रिक्त आहेत.गेली सहा सात वर्षे राज्य आयोगाला अध्यक्षच नव्हता, त्यावेळी काही काळ ठाणे पोलिस आयुक्त विजय कांबळे यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती.आयोगाकडे वाहने, बजेट ह्याची तरतूद नव्हती.सी फेसला वरळी डेअरीच्या इमारतीत कार्यालय असलेल्या आयोगाकडे अत्याचारग्रस्तांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाइनची सोय नाही.राज्य आयोगाची वेबसाईट नाही.मानवाधिकार आयोगाला जसा समन्स बजावण्याचा अधिकार आहे, तसा अधिकार या आयोगाला नाही.आयोगाला अर्धन्यायिक अधिकार मिळावेत म्हणून कायद्याचे प्रारूप बनवण्यात आले आहे.मात्र, सामाजिक न्यायमंत्री विभागाचे प्रधान सचिव या विधेयकाबाबत अनुत्सुक आहेत. परिणामी, आयोगाला ताकद देणारे विधेयक अनेक वर्षे उलटूनही विधिमंडळात सादर होऊ शकले नाही.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची कथा ह्या पेक्षा वेगळी नाही.दोन्ही आयोगाला सद्या अध्यक्ष नाहीत.आयोगाच्या सचिवालयीन ३३ पदांपैकी १५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची अनुसूचित जातीबाबतची नेमकी मानसिकता या रिक्त पदा मधून स्पष्ट होते.अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रमाणात अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद न करणे, अनुसूचित जाती आयोगाला अनेक वर्षे अध्यक्ष व सल्लागार समिती नसणे, अनुसूचित जाती जमाती वरील अन्याय अत्याचार यांची माहिती लोकसभा राज्यसभेच्या पटलावर ठेवली न जाणे, अट्रोसिटी गुन्ह्याकरीता विशेष जलदगती न्यायालये जाहीर होऊन त्यांची अंमलबजावणी न होणे या व अश्या अनेक बाबी भाजप सरकारचे अनुसूचित जातीबद्दल असलेला मनुवादी दृष्टीकोन स्पष्ट करीत असल्याने जाणीवपूर्वक या नियुक्त्या करण्यात आल्याच नाही.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पाच सदस्यीय सल्ल्लागार समिती मध्ये तीन श्रीवास्तव ,वंचितच्या तक्रारी नंतर सल्लागार समितीला मिळाला होता नारळ.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या पाच सदस्यीय सल्लागार समिती मध्ये तीन श्रीवास्तवचा समावेश करण्यात आला होता. त्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या समिती मुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग श्रीवास्तव प्रायवेट लिमिटेड बनविण्यात आल्याचा आरोप करित राष्ट्रपती कडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारच्या अवर सचिवांनी दि. २० ऑगस्ट रोजी समिती रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला होता.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सल्लागार समिती ५ ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती.अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी पाच जणांची समिती निवडण्यात आली.त्यामध्ये सदस्य सचिव कॅप्टन प्रभान्शु श्रीवास्तव ह्यांचेसह सदस्य म्हणून हर्ष श्रीवास्तव आणि पलश श्रीवास्तव ह्यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नावावर “श्रीवास्तव प्रायव्हेट लिमिटेड ” गठीत करण्यात आला असून ही निवड रद्द करण्यात यावी, अशी तक्रार राष्ट्रपती कडे वंचित चे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली होती.

जाहीर केलेल्या सल्लागार समिती मध्ये सदस्य म्हणून निवडलेल्या हर्ष श्रीवास्तव आणि पलश श्रीवास्तव ह्यांचे वडिलांचे नाव निवड यादीत दिलेले नव्हते.त्यांची केवळ नावे आणि आडनाव नमूद होती.त्यामुळे आयोगाचे सदस्य सचिव कॅप्टन प्रभान्शु श्रीवास्तव ह्यांचे व सदस्यांचे नाते उमगत नाही.तथापि पाच सदस्यीय समिती मध्ये तीन “श्रीवास्तव” असणे ह्यातून अनुसूचित जाती आयोगाच्या कामकाज प्रभावित होत असल्याने अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाची वाट लावली जाणार आहे, ह्याचे विरुद्ध तक्रार केली होती.सोबतच सेवानिवृत्त सनदी अधिकारी शारदा प्रसाद हे आयोगाचे अध्यक्ष तर डॉ सत्य श्री ह्यांचा पाच सदस्यीय समिती मध्ये समावेश होता.डॉ सत्य श्री हे नेमके ‘श्री’ च आहेत की श्रीवास्तव हे देखील स्पष्ट नसल्याचा आक्षेप वंचित ने घेतला होता.ह्यावर अनुसूचित जाती आयोगाच्या वतीने २० ऑगस्ट रोजी सल्लागार समिती रद्द करण्यात आल्याचा आदेश अवर सचिव किशन चंद ह्यांनी काढला आहे.त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर बनवाबनवी करण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस होते.केंद्र आणि राज्यातील सरकार जाणीवपूर्वक अनुसूचित जाती जमाती वर अन्याय करीत असल्याने सामाजिक न्याय होणारब तरी कसा ? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.

सुरेश नंदिरे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी

Tags: जाती
Previous Post

मिशन बिगेन अंतर्गत 31 आक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात सुधारित आदेश – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

मजलापूर ग्रामपंचायत मध्ये 14 वित्त आयोग मधील कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola news

मजलापूर ग्रामपंचायत मध्ये 14 वित्त आयोग मधील कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार!

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी चे वतीने बाळापूर तहसिलदार यांना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.