तेल्हारा(प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्हयात नो मास्क नो…….अंतर्गत कारवायांचा सपाटा सुरू असून तेल्हारा येथे दोन दिवसात ९२ जनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिक तसेच दुचाकी चारचाकी वाहन चालविताना मास्क न लावता चालवणाऱ्या दोन दिवसात ९२ जणांवर कारवाई करण्यात आली यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे व कर्मचारी तसेच न प चे दादाराव इंगळे व कर्मचारी यांच्या कडून शहरात नो मास्क नो……ही मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात आली.कारवाई च्या भीतीपोटी का होईना मात्र शहरवाशी मास्क चा वापर करताना दिसत आहेत.