अकोला(प्रतिनिधी)– राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वा. कुटासा ता. अकोट येथे आगमन व स्मृतीशेष रामकृष्ण मिटकरी यांच्या व्दितीय सोहळा निमित्त व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळाकरीता कोटेश्वर मंदिर, कुटासा येथे उपस्थिती. सकाळी 10 वा. 30 मिनीटाने कुटासा येथून दर्यापूर दहिहांडा मार्ग कुरळपूर्णा जि. अमरावती कडे प्रयान करतील.