तेल्हारा (प्रतिनिधी)- महिन्या भरा पासून जे काम तेल्हारा पालिकेने रेंगाळत ठेवले होते ते नळ जोळनीचे काम शिवसेनेच्या पदाधिकारी व नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे “अवर अकोला न्यूजने” याबाबत वृत्त प्रकाशित करताच पालिकेच्या पदाधिकाऱ्यानी याची वेळीच दखल घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी युद्धपातळीवर सात्काबाद येथील नळ जोळनीच्या कामाला सुरुवात केली.
शहरातील सात्काबाद येथील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पान्यासाठी भटकती सुरु झाली आहे तरी भेदभाव न करता सात्काबाद येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे तालुका समन्वयक प्रवीण वैष्णव यांच्या नेतृत्वात सात्काबाद येथील नागरिकांनी तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा व मुख्याधिकारी यांना दि . २९ सप्टेंबरला निवेदन देऊन मागणी केली होती या वेळी नगरपालिके मध्ये प्रवीण वैष्णव यांनी आक्रमकतेने जनतेच्या समस्या पालिका अधिकारी व पदाधिकारी कड़े माडून कमिशन साठी ठेकेदरांच्या बैठका कमी करून जनतेचे प्रश्न सोळवा नाहीतर कमिशनराजचा पर्दाफाश करू असा दम भरून इशारा दिला होता .शहरा मधे काही भागात पानी पुरवठा सुरळीत चालू आहे तसेच कहि विशेष नगरसेवकांच्या प्रभागात सुद्धा पानी पुरवठा सुरळीत चालू आहे परंतु काही भागा मधे मात्र चार पांच दिवसांपासून पानी पुरवठा पूर्ण पने बंद आहे यावरून नगर पालिके मध्ये भेदभाव सुरु आहे . सात्काबाद परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पानी येऊ लागले नाही गेल्या अनेक दिवसांपासून पाइप लाइन या भागात जोळल्या गेली नाही त्यामुळे या भागात नागरिक राहत नाहीत काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे पानी मिळत नसल्यामुळे आम्हाला काम धंधे सोळून दुरवरून पानी आनावे लागत आहे नगरपालिकेत नागरिकांना पाणी देण्यासाठी भेदभाव होत आहे त्यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे तसेच पान्यासाठी आम्हाला भटकती करावी लागत आहे तरी आमच्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती तसेच मागणी मंजूर न झाल्यास कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार व त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद चि राहणार असा इशारा सुद्धा निवेदनातून दिला होता तसेच कमिशनराजचा मुद्दा उपस्थित करून पालिकेच्या पदाधिकाऱ्याना खिण्डित गाठल्यामुळे तेल्हारा नगर पालिकेने लगेच दुसऱ्या दिवशी नळ जोळनीचे काम सुरु केले हे येथे उलेखनीय नाही तर नागरिकांच्या अनेक समस्या अनेक वेळा मागणी करून सुद्धा सोळविन्यात आल्या नाहीत त्यामुळे समस्या ग्रस्त नागरिकांना सुद्धा आता शिवसेने सारखी भूमिका घ्यावी लागणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.यावेळी नागरिकांनी अवर अकोला न्यूजचे आभार मानले हे विशेष