अकोला(प्रतिनिधी) : दोन महिन्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून काढून टाकलेला कांदयावर कुठेशी भाववाढीची बोंब नसताना विदेश व्यापारअधिनियमातील आपले अधिकार वापरून केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदी लादली दरवर्षी अश्याच प्रकारे आयात-निर्यातीचे अधिकार बेदरकारपणे वापरून, तर कधी फुकटात वाटून शेतकन्यांच्या मालाचे बाजारभाव पाडण्याचा हा क्रूर खेळ थाबविण्यासाठी किसान ब्रिगेडच्यावतीने २ ऑक्टोबरला दांडीयात्रा काढून ३ ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावर सर्व शेतकरी यांधवाना एकत्र जमवून आपली नाराजी राज्यपालांच्या कानावर घालून त्यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे पोहचवण्याची विनंती किसान ब्रिगेड करणारआहे. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, विजमंत्री यांची सुद्धा भेट घेऊन शेतकऱ्यांच्या राज्यसरकारच्या अखत्यारीतील
समस्या व शेतमालाविषयी चर्चा करणार आहेत. यासाठी राज्यातील शेतकयांनी दुचाकी, चारचाकी वाहनाने किसान ब्रिगेडकडून दिलेल्या सुचनेप्रमाणे दाडीयात्रेत सहमागी होण्याचे आवाहन किसान ब्रिग्रेडच्या वतीने करण्यात आले असून, आपले हे आंदोलन नाही तर शांततेत निघणारी दांडीयात्रा आहे, त्यामुळे शांतता कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यायची सूचना किसान ब्रिगेडच्या पत्रकात करण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कुठल्याही चर्चेविना घाईघाईत मंजुरी मिळालेल्या तिन्ही कृषी विधेयका विरोधात सध्या देशभरात शेतकऱ्यांची आदोलने सुरू असताना त्याची यत्किचितही दखल न घेता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला आपल्या सहमतीची मान्यता दिली यामुळे आता या तिन्ही विधेयकाचे कायद्यातच रूपांतर झालं आहे, ज्याचा निषेध सुद्धा करावयाचा आहे. दरवर्षी आयात-निर्यातीचे अधिकार बेदरकारपणाने वापरून तर कधी फुकटात वाटून शेतकऱ्यांच्या मालाचे बाजारभाव पाडण्याचा हा क्रृर खेळ आता थाबलाच पाहिजे. आज कांदा आहे उद्या कापूस किवा सोयाबिन तर परवा साखरेवर आणि अश्या प्रकारे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावरच गंडांतर येईल. त्यामुळे अशा प्रकारची निर्यातबंदी किंवा फुकट वाटप करून शेतमालाचे भाव पडण्याची ही पद्धत म्हणजे तमाम शेतकरी वर्गावरच सरकारने घातलेला घाव आहे असे किसान ब्रिगेड़ने पत्रकात स्पष्ट केले आहे.यासाठी बिभाग, जिल्हा, धर्म, जात हे सारे भेदाभेद विसरून आता शेतकरी बांधवानी एकत्र आलेच पाहिजे म्हणून किसान ब्रिगेडने शेतमालाच्या निर्यातबंदी आणि केंद्र तसेच राज्यसरकारच्या एकंदरीतच शेतकरी विरोधी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून, किसान ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी आणि शेतकरयाप्रती स॔वेदना बाळगणारे अशा सर्वांनी स्वतःच्या जबाबदारीवर आपापल्या गावात चारचाकी, दुचाकी आदी वाहनांनी शांततेत सरकारी नियमाचे पालन करीत मुंबईकरीता निघण्याचे
आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
दाडियात्रेत सामील होणाऱ्या सर्वांनी एकमेकाच्या संपर्कात राहून उगाच कुठेही वेळ न घालविला जबाबदारीचे पालन करायच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नाष्टा, जेवण याची मार्गात सोय केली आहे. त्यामुळे उगाच त्याकरीता कोठेही थांबु नये असेही सांगितले आहे.
जे वेळेत आलेत त्यांना घेऊन यात्रा पुढे निघणार आहे. जे वेळेवर पोहचनार नाहीत त्यांची वाट पाहल्या जाणार नाही असे अगदी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सामील होणाऱ्या शेतकऱ्यांनी जमल्यास स्वतःचा नाष्टा आणि थोडेबहुत खाण्यासाठी सोबत आणण्याचीही सुचना करण्यात आली आहे. मुंबईत भेटी झाल्यानंतर ताबडतोब परत निघायचे आहे, त्यामुळे प्रत्येकाने दोन चादरी, टावेल ,एखादा ड्रेस, थोडेसे पैसे यापेक्षा जोखमीची कुठलीच वस्तू सोबत आणू नये, असे आवाहनही किसान ब्रिगेडच्या
वतीने करण्यात आले आहे.