तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरातील सात्काबाद येथील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पान्यासाठी भटकती सुरु झाली आहे तरी भेदभाव न करता सात्काबाद येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी तेल्हारा नगर परिषद च्या अध्यक्षा व मुख्याधिकारी यांना आज २९ सप्टेंबरला निवेदन देऊन केली .
तेल्हारा शहरा मधे काही भागात पानी पुरवठा सुरळीत चालू आहे तसेच कहि विशेष नगरसेवकांच्या प्रभागात सुद्धा पानी पुरवठा सुरळीत चालू आहे परंतु काही भागा मधे मात्र चार पांच दिवसांपासून पानी पुरवठा पूर्ण पने बंद आहे यावरून नगर पालिके मध्ये भेदभाव सुरु आहे . आमच्या सात्काबाद परिसरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पानी येऊ लागले नाही गेल्या अनेक दिवसांपासून पाइप लाइन या भागात जोळल्या गेली नाही त्यामुळे या भागात नागरिक राहत नाहीत काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे पानी मिळत नसल्यामुळे आम्हाला काम धंधे सोळून दुरवरून पानी आनावे लागत आहे नगरपालिकेत नागरिकांना पाणी देण्यासाठी भेदभाव होत आहे त्यामुळे आम्हाला पाणी विकत घ्यावे लागत आहे तसेच पान्यासाठी आम्हाला भटकती करावी लागत आहे तरी आमच्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली तसेच मागणी मंजूर न झाल्यास कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार व त्याची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद चि राहणार असा इशारा सुद्धा देण्यात आला .निवेदनावर प्रवीण वैष्णव ,शेख इमरान , हयात खान , शे. नाजिम , शे. अख्तार , गजानन चहाजगुने , शंकरराव भुजबले , रमेश भुजबले , सानिया मिर्जा , रजिया पटेल , शारुख पठान , गजानन मालठानकर , राजेश्वर विखे , फिरोज खाँ , इत्यादी असख्य नागरिकांच्या स्वाशऱ्या आहेत .
तेल्हारा नगरपालिके मधील कमिशन राज बंद करुण जनतेचे प्रश्न सोळवा
तेल्हारा नगरपालिके मधे फक्त ठेकेदारांकळू न कमिशन घेण्याबाबतच बैठका होतात मात्र जनतेच्या प्रश्ना कडे लश देण्यासाठी पदाधिकारी यांना वेळ नाही या पद्धतिमुळे नागरिकांनवर अन्याय होत आहे या पालिकेत जनतेचे अनेक पश्न मार्गी लागले नाहीत पालिकेने कमिशन कळे दुर्लक्ष करून जनतेचे प्रश सोळावे
प्रवीण की. वैष्णव
तालुका समन्वयक शिवसेना
तेल्हारा
::::;:::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::
नागरीकांच्या जीवनावश्क सुविधा वर सुद्धा लक्ष द्यावे अन्यथा नागरिकांना आपल्या स्वताच्या समस्या सोळविन्यासाठी स्वतालाच रस्त्यावर उतरावे लागेल
शेख अक्रम
अल्प संख्याक शहर अध्यक्ष काँग्रेस
तेल्हारा