तेल्हारा (प्रतिनिधी)- एम एस वर्कर्स फेडरेशन व सबोर्डीनेट इंजिनियर असोसिएशन शाखा तेल्हारा च्या वतीने केंद्रीय नेतृत्वाच्या उत्तर प्रदेश वीज कंपन्याचे खाजगीकरण विरोधात पुकारले ल्या आंदोलन उत्तर प्रदेश सरकारने वीज अभियंता, कर्मचारी यांना जेल मध्ये टाकल्याचा निषेध स्थानिक महावितरण उपविभागीय कार्यालय तेल्हारा येथे दि 29 सप्टेंबर 20 रोजी दु 2 वाजता निषेध द्वार सभा घेऊन या हुकूमशाही कार्यवाही चा जाहीर निषेध करण्यात आला, या निषेध सभेला उपकार्यकारी अभियंता श्री सचिन कोहाड,एस इ ए चे इंजि आकाश गुप्ता, पंकज गुहे, वर्कर्स फेडरेशन चे कॉ निलेश मगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, देशात कामगार कायदे आणि कामगार कायदे बदलून एक।प्रकारे सरकारने कामगार च घात घातला आहे आणि याला सर्व मिळून विरोध करून हा कायदा रद्द करणे साठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे यावेळी आपल्या मार्गदर्शन करताना सांगितले, यावेळी जाहीर निषेध सभेला इंजि प्रवीण जाधव, इंजि कु कल्याणी गावंडे, वर्कर्स फेडरेशन चे विभागीय सचिव कॉ योगेश राऊत, तेल्हारा शाखा सचिव कॉ अफसर शाह, कॉ अमित सातळेकर,कॉ अरविंद मोरोकर, कॉ विठ्ठल शेळके, कॉ निखिल मिसाळ, कॉ अमोल अढाऊ,कॉ संजय माकोडे, कॉ जया जगताप, कॉ कमलेश गासे,कॉ कॉ किशोर मालगे, कॉ नागोराव अमझरे,कॉ प्रशांत घाटोळ,कॉ अशोक पिंपळकर, कॉ मंगळे, कॉ संदीप शेकोकार,कॉ कॉ सुनंदा काळे, कॉ संतोष सुशिर, कॉ अक्षय राऊत ,अमित पांडे ,सहित वर्कर्स फेडरेशन व एस इ ए चें पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ अफसर शाह अन्वर शाह यांनी केले