मुंबई :
काल माध्यमांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळात होणार्या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगतानाच आघाडी सरकारचे भवितव्य अस्थिर असल्याचा पुनरुच्चार केला. पाटील यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी ट्विट करत “चंद्रकां(ता) की कहानी बडी लगती है सुहानीll अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे.
आगामी काळात होणार्या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगतानाच आघाडी सरकारचे भवितव्य अस्थिर असल्याचा पुनरुच्चार पाटील यांनी केला. एखाद्या दिवशी काही अनपेक्षित घडून सरकार पडले, तर लगेचच मध्यावधी निवडणुका होतील असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले. अवघ्या नऊ महिन्यापूर्वी निवडणुका झालेल्या असल्याने आता मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे कोणत्याही पक्षाला वाटणार नाही. त्यामुळे सर्वच पक्ष त्या टाळण्यासाठी प्रयत्न करतील असे पाटील यांनी सांगितले. मात्र, नवीन समीकरणे जुळून नवीन सरकार स्थापन न झाल्यास त्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यापार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. मात्र, कृपया कोणीही याला राजकीय वळणावर नेऊ नये. सहज आठवलं म्हणून पाठवलं अशी सुचना देखील त्यांनी दिली आहे. “चंद्रकां(ता) की कहानी ! ये माना है पुरानी l ये पुरानी होकर भी l बडी लगती है सुहानी ll ” अशा आशयाचे ट्विट करत अप्रत्यक्षपणे मिटकरी यांनी पाटील यांना खोचक चिमटा काढला आहे.