पातूर (सुनिल गाडगे):
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्य घटनेनुसार अनुसूचित जाती/जमाती सुधारणा अध्यादेश1956व1976नुसार अनुसूचित जमातीच्या अनुसूचिप्रमाणे अध्यादेश ची अंमल बजावणी करणे करिता पातूर तालुक्यातील धनगर समाज बांधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पातूर तहसीलदार दिपक बाजड यांच्या
मार्फत सोमवारी धनगर समाजाचे शिवाजीराव काळे, भारत भाऊ चिकटे, बाळूभाऊ
वसतकार ,संतोष गव्हाळे,यांच्या नेतृत्वाखालीनिवेदन दिले
यावेळी धनगर समाज बांधव उपस्थित होते
यावेळी6जुलै20217रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय ची अंमल बजावणी करण्याची सुद्धा मागणी केली आहे
राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या 1कोटी50लाख आहे मात्र स्वातंत्र्य पूर्वी आणि नंतरही हा समाज मागास आहे सामाजिक पारंपरिक व्यवसाय शेळी व मेंढी पालनाचा आणि घोंघडी विणण्याचा असून आजही या व्यवसायासह शेती करतात, समाजात स्त्री शिक्षण चे प्रमाण केवळ2%आहे तर पुरुष साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, आर्थिक, सामाजिक, राजकीय, व,शैक्षणिक क्षेत्रात मागास आहे अतिशय हलाखीचे जिवन जगत असून महाराष्ट्र राज्य आणि देशात एकही लोकसभा सदस्य नाही त्यामुळे विकासापासून वंचित राहावे लागते आहे
म्हणून घटनेत दिल्या प्रमाणे राज्य घटनेनुसार सुधारणा अध्यादेश अनुसूचित जमातीच्या अनुसूचिप्रमाणे अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे
निवेदन देणाऱ्या मधे शिवाजी काळे, भारत चिकटे, बाळूभाऊ वसतकर,संतोष काळे, विठ्ठल तांबडे, सुमेध हातोले, नीलकंठ भदे, आकाश भदे, पवन वसतकर
राजेश जामणिक, पवन गव्हाळे, गणेश वसतकर,शुभम कवळकर, निखिल चिकटे आदींचा समावेश होता