पातूर (सुनिल गाडगे) : पंचायत समिती पातूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ.अरुण आडे यांचा बेटालपणामुळे तालुक्यातील लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
पातूर शहरातील विश्रामगृहाजवळ असलेल्या पशुसंवर्धन कार्यालयात गोरगरिबांची ससेहोलपट तिथले अधिकारी व कर्मचारी करत आहेत. वर्ष 2019 मध्ये समाजकल्याण मार्फत दुधाळ जनावरांचा वाटप अद्यापपर्यंत झाला नसल्याने लाभार्थी या कार्यालयात योजनेचा लाभ कधी मिळेल याची चौकशी करण्याकरिता आले असता पातूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ.अरुण आडे त्यांना योग्य माहिती न देता उद्धटपणाने एकेरी बोलून अपमानास्पद वगणूक देतात. गोरगरीब लाभार्थी आपला लाभ मिळावा म्हणून दबावात येऊन त्यास प्रत्युत्तर देत नाहीत.
डॉ.अरुण आडे च्या बेतालपणाची माहिती मिळाली असता एका न्यूज चॅनल चे प्रतिनिधी शहानिशा करण्याकरिता गेले असता, डॉ.आडे पत्रकारासमोरच दुधाळ जनावरांच्या वाटपासंबंधी चौकशी करण्याकरिता आलेल्या एका वयस्क लाभार्थीला अपमानास्पद बोलल्याने सदर पत्रकाराने या मुजोर अधिकाऱ्याचा खरपूस समाचार घेतला.सदर घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.दरम्यान या हेकेखोर मुजोर अधिकाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी संबधित अधिकारी तथा लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का ? असा प्रश्न जनसामान्यांत उपस्थित होत आहे.