अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 387 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 307 अहवाल निगेटीव्ह तर 80 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एक मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7188(5921+1112+155) झाली आहे. आज दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 38090 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 37132, फेरतपासणीचे 206 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 752 नमुने होते. आजपर्यंत एकूण 37332 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 31411 तर पॉझिटीव्ह अहवाल 7188(5921+1112+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 80 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 80 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 59 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 15 महिला व 44 पुरुष आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील 13 जण, अकोट येथील सात जण, छोटी उमरी, डाबकी रोड व बाळापूर येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, मोठी उमरी, बोरगाव मंजू, जीएमसी, शास्त्रीनगर व ओझोन येथील प्रत्येकी दोन जण, उर्वरित जोगळेकर प्लॉट, हिंगणारोड, श्रीवास्तव चौक, डोंगरगाव, गजानन नगर, नानक नगर, कोठारी वाटिका, पत्रकार कॉलनी ,जुनेशहर, पाथर्डी अकोट ,वरुर अकोट, कुटासा, शिवापुर, कानेरी, रंजना नगर, आदर्श कॉलनी, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 21 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात महिला व 14 पुरुष आहे. त्यातील शास्त्री नगर येथील चार जण, खडकी, कौलखेड, गांधीग्राम व बार्शीटाकळी येथील दोन जण, तर उर्वरित कान्हेरी सरप, तुकाराम चौक, लेबर कॉलनी जूने तारुफैल, खडकी, रामनगर, पिंपरी खु., वाशिम बायपास, मोठी उमरी व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
एक मयत
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगांव मंजू येथील ६५ वर्षीय महिला असून ती २४ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
61 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 31 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 16 जण, युनिक हॉस्पीटल येथून एक जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून पाच जण, हॉटेल स्कायलॉक येथून दोन जण, तर कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून सहा जणांना, अशा एकूण 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
1531 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7188(5921+1112+155) आहे. त्यातील 225 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5432 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1531 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.