तेल्हारा(प्रतिनिधी)- आज सकाळी तेल्हारा तालुक्यातील दहीगांव परिसरात गजानन घंगाळ यांच्या शेतात मजूर वर्ग शेतात गेल्या नंतर त्यांना हरणाचे शिकार केल्याचे व बिबटयाचे पावलांचे निशाण आढळून आले याची माहिती पोलीस पाटील अरविंद अवताडे यांनी दिली असून दहीगांव परिसरातील मजूर व शेतकरी यांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे तसेच वन विभाग ला कडविण्यात आले, यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी तेल्हारा पोलीस निरीक्षक देवरे साहेब यांना दहीगांव फाट्या नजीक बिबट्या आढळून आला होता याबाबत सुध्दा वन विभाग कडे माहिती देण्यात आली होती वनविभागीय अधिकारी माने , सहाय्यक बडोदे , अकोला वनविभाग परीक्षेत्र अधिकारी ओवे वनपाल चावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग D.A सुरसे बोर्डी बिट यांचे सहाय्यक दीपक मेसारे यांनी दहीगाव शिवार गाठले होते परंतु त्यांना बिबट्या निशाण आढळून आले नाही.