पातुर(सुनिल गाडगे)- राहेर येथे लॉकडाऊनच्या काळात सरकारने अतिरीत धान्य वाटप केले.सामाजिक संस्था आणी दानशूर कार्यकर्त्यांनी व्यक्तीनिंही काही त्यात पुढाकार घेतला.मात्र तेव्हा नियोजनाच्या पद्धतीने झालेल्या वाटपाचे दुसरे पैलू समोर येत आहे.सरकार सामाजिक संस्था आणी दानशुरांनी वाटलेल्या धान्याचा काळाबाजार होऊन तेच धान्य वाढीव किंमतीत बाजारात विक्रीला येत आहे.त्यायासंदर्भात धान्य राशन डिलर यांच्या वर कठोरपणे कारवाई करण्यात यावी.अशी मागणी सौ.राजश्रीताई,अशोक बोराडे,यांनी पातूरचे नायब तहसीलदार सै.ऐहेसानोदद्दीन,यांना निवेदन देण्यात आले असता सौ.राजेश्रीताई अशोक बोराडे,मधूकर ढोरे,गोपाल पारस्कार,अशोक बोराडे,आणी गावातील नागरिक साक्षरतेचे पुरावे लागले आहेत.राहेर येथील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत आणी ग्राहकाकडुन शासनाच्या नियमानुसार किंमत न घेता ग्राहकाकडून जास्त किंमत वसुल करतात आणी बिल पण देत नाहीत.
मी आपणास विनंती पुर्वक अर्ज सादरकरतो की श्री.डिगांबर कोरडे,हे या महीन्यामध्ये (सप्टेंबर) आलेले धान्य जसे की(गहु,मका,तांदूळ,दाळ, साखर)हे जास्त किंमती मध्ये विकत आहेत.जसे की मका १ रू प्रति, किलो असुन ती राहेर गावामध्ये ३ रू प्रती कीलो या दराने विकत आहेत तसेच केसरी APL व पिवळे BPL या दोन पुस्तका वरती शासनाचा वाटप माणसी ५ कीलो आहे परंतु धान्य दुकानदार हा माणसी ४ कीलो करत आहेत.तसेच अंत्योदय कार्डावर ३५ कीलोचा वाटप असून ते ३० कीलोच वाटप करत आहेत.या महिन्यात हरभरा दाळ सुद्धा वाटप केली नाही आजूबाजूच्या गावामध्ये मोफत दाळ ही वाटप करण्यात आली आहे.परंतु राहेर या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हा काळाबाजार होताना दिसून येत आहे.काही ग्रामस्थांनी राशन दुकानदार यांना काहीकवेळा बोलले असता आम्हाला गहू,तांदूळ कमी मिळत आहेत.ते सांगाऱ्याचे की वरूनच माल कमी आला असे सांगायचे परंतु राहेरचे स्वस्त राशन दुकानदार हे गेल्या 5 वर्षांपासून असे सांगत आले आहेत परंतु राहेरचे राशन दुकानदार यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी ग्रामस्थ करित आहेत.